गहिनीनाथ समाचार रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

कागल : स्वर्गीय दिलीपरावजी सणगर यांच्या गहिनीनाथ समाचार रोप्य महोत्सवी वर्धापनदिन आणि सत्कार समारंभ नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. २०२५ वर्षात गहिनीनाथ समाचार रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले असून, या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे अनावरण आणि शुभारंभ करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय शिक्षण मंत्री, हसनसो मुश्रीफ आणि माजी आमदार व चेअरमन, अन्नपूर्णा शुगर अँड … Read more

चोरीच्या दोन मोटर सायकली जप्त; मुरगुड पोलिसांची कारवाई

मुरगुड (प्रतिनिधी): मुरगुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटर सायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून, एका विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून ३०,०००/- रुपये किमतीच्या दोन चोरीच्या मोटर सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई २४/०९/२०२५ रोजी करण्यात आली. गुन्ह्यांचा तपशील: मुरगुड पोलीस ठाण्यात मोटर सायकल चोरीसंदर्भात गुन्हे दाखल होते: पोलिसांनी केलेली कारवाई: कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक श्री. … Read more

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात प्लास्टिक निर्मूलन व स्वच्छता मोहीम

मुरगूड ( शशी दरेकर ): सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा दिनाचे औचित्य साधून स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. या उपक्रमात “स्वच्छ परिसर – सुंदर परिसर” हा संदेश देत प्लास्टिक निर्मूलन व पर्यावरण संरक्षणाची जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांच्या … Read more

मुरगूड येथिल शिवराजच्या व्हॉलीबॉल संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) : मिणचे (ता-हातकणंगले) येथे झालेल्या जिल्हास्तरीय शासकीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत १९ वर्षाखालील गटात येथील शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मिणचे (ता-हातकणंगले)येथे झालेल्या स्पर्धेत शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या १९ वर्षाखालील संघाने अंतिम सामन्यात उद्धव चौगले याच्या उत्कृष्ठ पासवर … Read more

परिस्थिती बदलावयाची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही – जिल्हाधिकारी अमोल येडगे

यमगेत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे शानदार उदघाट्न मुरगूड (शशी दरेकर) – कोल्हापूर जिल्हा हा शिक्षणामध्ये अग्रेसर आहे. शासनाच्या वतीने शिक्षणाच्या मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. युपीएससी यशस्वी झालेल्या बिरदेव डोणे यांनी प्रतिकूल परिस्थितीत प्रामाणिक पणे शिक्षण घेऊन आपली परिस्थिती बदलली. शिक्षणामुळेच ते आजच्या पिढीचे आयडॉल झाले. त्यामुळे परिस्थिती बदलावयाची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही … Read more

कागल येथे महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लुटले; भररस्त्यात दुचाकीवरून येऊन केली चोरी

कागल: कागल येथील शासकीय नर्सरी कमानीच्या समोर हायवेवर, पुणे-बेंगलोर रोडवर एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून पळ काढल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दिनांक २१/०९/२०२५) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निर्मला इंद्रजित संपकाळ (रा. गहिनीनाथनगर , कागल) या … Read more

कागल मंडळ कार्यालयात ‘सेवा पंधरवडा’ उत्साहात साजरा

कागल (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान योजनेअंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आज, २३ सप्टेंबर रोजी येथील बहुउद्देशीय सभागृह, तहसील कार्यालय येथे कागल मंडळात फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीमध्ये एकूण ३३ फेरफार नोंदी मंजूर करण्यात … Read more

गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला अटक

४१ हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड येथे सुर्यवंशी पेट्रोलपंपाजवळ गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या प्रमोद पांडुरंग भोई (वय ३३ रा तुकाराम चौक,मुरगूड) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ताब्यात घेऊन विक्री साठी आणलेला १ किलो ३०० ग्रॅम.वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकूण ४१ हजार ५०० रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला … Read more

राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी शेंडूरच्या कुमार श्लोक विनायक शिंदे यांची निवड

कागल (विक्रांत कोरे) : जवाहर नवोदय विद्यालय पलूस जिल्हा सांगली येथे शिकणारा शेंडूर तालुका कागल येथिल रहिवासी कुमार श्लोक विनायक शिंदे यांची अयोध्या येथे होणाऱ्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. त्यांना मार्गदर्शन म्हणून प्राचार्य कांबळे सर व क्रीडा प्रशिक्षक अक्षय बागडे सर यांचे मार्गदर्शक म्हणून लाभले.

नवरात्री उत्सवनिमित्त कागलच्या ऐतिहासिक श्री राम मंदिरमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम

कागल (विक्रांत कोरे) : शारदीय नवरात्री उत्सवनिमित्त येथील ऐतिहासिक श्री राम मंदिरमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. श्री राम मंदिर देवस्थान जिर्णोध्दार समितीच्यावतीने या सर्व कार्यक्रमांचे संयोजन केले आहे.आज सोमवारी (ता.२३) सकाळी मंत्रोघोषात अभिषेक व विधीवत घटस्थापना करुन या उत्सवास प्रारंभ झाला. कागल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शाहू ग्रुपचे संस्थापक दिवंगत राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या … Read more

error: Content is protected !!