मुरगूड (शशी दरेकर) : येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या व्हॉलीबॉल संघास प्राचार्य डॉ शिवाजी होडगे यांच्या हस्ते टी शर्ट प्रदान करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ शिवाजी होडगे म्हणाले , सलग तीन वर्षे महाविद्यालयाने इंटरझोन व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे . यावेळी राणाप्रताप व्हॉलीबॉल क्लबचे प्रशिक्षक, माजी प्राचार्य महादेव कानकेकर यांनी क्लबच्या वाटचालीचा आढावा घेतला.
Advertisements

यावेळी कोजिमाशिचे संचालक अविनाश चौगले, प्रा.उदय शेटे , विनोद रणवरे ,सुहास भारमल उपस्थित होते. यावेळी संघातील करण मांगले, विवेक चौगले, सागर संकपाळ, विश्वजीत रामाणे, निखिल सावंत, सत्यजित शिंदे, विश्वराज जाधव, विक्रम रानमाळे, बुद्धीराज माने, मितेश सावंत, अभी रामाणे हे खेळाडू उपस्थित होते.