मुसळधार पावसाचा फटका: वंदूर-सिद्धनेर्ली बंधारा पाण्याखाली, वाहतूक ठप्प

कागल / प्रतिनिधी : गेली चार दिवस झाले पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. मुसळधार पावसाने दूध गंगा  नदी ओव्हर फ्लो झाले आहे. झपाट्याने वाढणाऱ्या पाणी पातळीने वंदूर – सिध्दनेर्ली दरम्यान चा बंधारा पाण्या खाली गेला आहे. हा बंधारा वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. प्रशासन यंत्रणा सतर्क ठेवणेत आली आहे.
         वंदूर- सिध्दनेर्ली दरम्यानच्या दुधगगा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे.या ब°धा-यावरुन नागरिक व शेतकऱ्यांची ये-जा असते. महामार्ग ते करनूर, वंदूर पुढे शेंडूर फाटा  मार्गे मुरगूड गारगोटी जाणारा हा शॉर्टकट मार्ग आहे. छोट्या कार, शेती पुरक ही वाहने येथुन ये – जा करीत असतात. या बंधाऱ्यावर पाणी आल्याने हा मार्ग बंद करणेत आला आहे.

 

Advertisements

         पाण्याची गती अधिक आहे. वंदूर  ग्रामपंचायतीने सतर्कता ठेवत रस्ता अडविण्यात आला आहे. या मार्गावर कोणी जाणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. सरपंच सौ धनश्रीदेवी घाटगे या लक्ष ठेवुन आहेत. सातत्याने अपडेट घेत आहेत.ग्राम विकास अधिकारी व त्यांचा स्टाफ सतर्क आहे.

Advertisements

           या बंधाऱ्यावरून वाहतूक बऱ्यापैकी असल्याने बंधाऱ्याची उंची वाढवावी अशी मागणी सरपंच सौ धनश्रीदेवी घाटगे यांनी लावून धरली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!