आदर्श अभियंता पुरस्कार आकाश दरेकर यांना प्रदान

मुरगूड (शशी दरेकर) : आदर्श सरपंच, उद्योजक, आदर्श अभियंता , समाजसेवा, शिक्षणसेवा, जनआरोग्य, लोकसेवक, कलारत्न, संस्था पुरस्कार अशा समाजातील २२ मान्यवरांचा यथोचित गौरव करुन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Advertisements

यावेळी आदर्श अभियंता मुरगूड येथिल आकाश दरेकर , आदर्श मुख्याधिपिका सौ . सुमन अनावकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरानां पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Advertisements

या कार्यक्रमासाठी माजी खासदार राजू शेट्टी (संस्थापक अध्यक्ष – स्वाभिमानी शेतकरी संघटना) होते तर प्रमुख उपस्थिती माजी आमदार के. पी. पाटील ,  (चेअरमन, बिद्री साखर कारखाना), सौ. विजयलक्ष्मी आबिटकर (गारगोटी), सुहासिनीदेवी पाटील (नगराध्यक्षा, मुरगूड), यशवंत  उर्फ बाबा नांदेकर (माजी सभापती पं.स.भुदरगड),  शोभाताई फराकटे (जि.प. सदस्या),  डॉ. जी. बी. कमळकर (सहाय्यक शिक्षण संचालक, कोल्हापूर), सौ. सारिका कासोटे (गटशिक्षणाधिकारी,  पंचायत समिती कागल),  डॉ. प्रतिभा देसाई (प्राचार्या, आचार्य जावडेकर महाविद्यालय, गारगोटी)अजित पोवार (जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना ) ,मुख्य संपादक अमरसिंह देशमुख, आवृत्ती संपादक दत्तात्रय वारके यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. आभार पत्रकार राजू चव्हाण यांनी मानले.

Leave a Comment

error: Content is protected !!