राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्य ” डॉ . संजय रामसे” यांचा यथोचित सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ) : रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा मानणाऱ्या मुरगूड ता . कागल येथिल डॉ . संजय रामसे यांचा ” साफल्य नर्सिंग होम ” या त्यांच्या हॉस्पिटल येथे जावून यथोचित सत्कार करण्यात आला.

Advertisements

     दरवर्षी १ जुलै रोजी “डॉक्टर दिन ” साजरा केला जातो . रुग्णांच्या आरोग्यासाठी दिवस रात्र निस्वार्थीपणे सेवा देणारे व कोरोनाकाळात अनेकांच्या अंःत करणात आपुलकीची जागा निर्माण करणारे डॉ . संजय रामसे यानी स्वःताच्या जिवाची पर्वा न करता रुग्णसेवा केली . त्या प्रती कृतज्ञता म्हणून कोल्हापूर जिल्हा बेकर्स ग्राहक संस्थेचे विद्यमान संचालक मा . महादेवराव साळोखे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Advertisements

      यावेळी सरपिराजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीचे चेअरमन हरिश्चंद्र साळोखे, पत्रकार शशी दरेकर यांच्यासह हॉस्पिटलचे कर्मचारी, महिला कर्मचारी, रुग्ण उपस्थित होते . यावेळी डॉक्टरांच्या निस्वार्थी सेवेबद्धल व त्यांच्या योगदानाबद्दल अनेक रूग्णानीं कृतज्ञता व्यक्त केली.

Leave a Comment

error: Content is protected !!