मुरगूड विद्यालय ज्यू . कॉलेजमध्ये करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न
मुरगूड (शशी दरेकर) : मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड व कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग कॉलेज कोल्हापूर यांच्या वतीने मुरगुड विद्यालयात करियर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा शुभारंभ मुरगुड च्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सुहासिनीदेवी प्रवीणसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या शिबीरास पाणीपुरवठा समिती सभापती सत्यजित पाटील, नगरसेवक रणजीत उर्फ बंडा भारमल, प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य एस.पी. पाटील होते.
औद्योगिक सुरक्षा या क्षेत्रातील देश-विदेशातील नोकरीच्या सुवर्णसंधी यावर यू आर माळी यांचे भाषण झाले, सिव्हिल इंजिनिअरिंग मधील आधुनिक तंत्रज्ञान पायाभूत सुविधा क्षेत्रातील वाढती मागणी आणि विद्यार्थ्यांना पदवीनंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्या संदर्भात ए.ई. महाडिक यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षा करिअर ची निवड करताना घ्यावयाची काळजी आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर वैष्णवी पाटील यांचे मार्गदर्शन झाले.

नगराध्यक्ष सुहासिनीदेवी पाटील म्हणाल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य वेळी मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे अशा शिबिरांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना मार्ग दाखवल्यास त्यांच्या दृष्टिकोन बदलण्यास मदत होऊन त्यांचे भावी आयुष्य सुकर होईल. यावेळी उपप्राचार्य व्ही जी घोरपडे, उपमुख्याध्यापक यु सी पाखरे ओ आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन यांनी टिपुगडे यांनी केले.