मुरगूड ( शशी दरेकर ) – कागल येथिल सरपिराजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या चेअरमनपदी श्री. हरिश्चंद्र बापूसो साळोखे यांची तर व्हा. चेअरपदी सौ. वैशाली पांडूरंग भारमल यांची निवड करण्यात आली.
या निवडीप्रसंगी सहकारी अधिकारी डी. आर. पोवार अध्यक्षस्थानी होते. यावेळी चेअरमनपदासाठी हरिश्चद्र साळोखे यांचे नांव मावळते चेअरमन जितेंद्र कुंभार यानीं सुचवले त्याला बाळू खामकर यानीं अनुमोदन दिले तर व्हा. चेअरमन पदासाठी सौ. वैशाली भारमल यांचे नाव मावळते व्हा. चेअरमन अनिल डवरी यानीं सुचविले त्याला संचालक प्रदिप बुधाळे – पाटील यानीं अनुमोदन दिले.

या निवडीनंतर हरिश्चंद्र साळोखे म्हणाले सरपिराजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या पुढील काळात पतपेढीच्या सर्वांगीन हिताचे निर्णय घेऊन व सर्व संचालकानां विश्वासात घेऊन पतपेढीच्या उत्तोरोत्तर प्रगतीसाठी आपण प्रयत्नशील असून काटकसरीचा, पारर्शक व सभासदाभिमुख कार्य करणार असल्याचे सांगितले.
निवडीनंतर शिक्षक नेते, जिल्हा परिषद सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक मा. सुनिल पाटील, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक बाळासाहेब निंबाळकर व सुकाणू समिती सदस्यांच्या हस्ते नूतन चेअरमन, व्हा. चेअरमन यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी पांडूरंग पाटील, बाळासो तांबेकर, तुकाराम इंगवले, विठ्ठल पाटील, रमेश कदम, महादेव गुरव, आनंदा कांबळे, सौ. रोहिणी लोकरे, तज्ञ संचालक बाळू कवडे यानीं पतपेढीच्या कार्यपद्धती बद्दल मनोगत व्यक्त केली.
या निवडीवेळी सुकाणू समिती सदस्य मोहन पाटील, प्रकाश मगदूम, एकनाथ बागणे, आनंदा गायकवाड, संजय दाभाडे, नेताजी कमळकर, संजय प्रधान, पांडूरंग भारमल, विशाल यादव, व्यवस्थापक संताजी पाटील, सभासद आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार विठ्ठल पाटील यानीं मानले.