का.न.प.ने राबवला स्वच्छता पंधरवडा स्वच्छता ही सेवा 2023 उपक्रम

कागल : कागल नगरपरिषदे मार्फत महात्मा गांधी जयंती चे औचित्य साधून स्वच्छता पंधरवडा स्वच्छता ही सेवा 2023 अंतर्गत 1 ऑक्टोबर 2023 एक तारीख एक तास हा स्वच्छता उपक्रम सकाळी 10.00 ते 11.00 दरम्यान कागल शहरामध्ये वीस ठिकाणी मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आले होते. या अभियाना मध्ये वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी … Read more

कागल आरटीओ येथे अपघातात दोन जखमी

कागल : कागल आर टी ओ नाक्या जवळ हायवे वर थांबलेल्या कंटेनर( GJ O1 JT 2231) ला मागून स्कॉर्पिओ गाडी (MH O2 EU 3576) ने जोराची धडक दिली. स्कॉर्पिओ गाडीच्या ड्रायव्हरला झोप लागली आणि त्याने झोपेत थांबलेल्या कंटेनरला मागून जोराची धडक दिली त्यामुळे गाडीचा पुढील भाग कंटेनरमध्ये अडकला. आणि ड्रायव्हर व त्याचा बरोबर असणारा व्यक्ती … Read more

मुरगूडमध्ये चोवीस तास सेवा देणारे युनिटी फार्मा मेडीकल मॉलचे शानदार उदघाटन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल बाजारपेठ येथे नव्यानेच सुरू केलेल्या २४ तास सेवा उपल्ब्ध करून देणाऱ्या युनिटी फार्मा मेडीकल मॉलचा शानदार उदघाटन समारंभ नुकताच पार पडला. उदघाटन समारंभास बिद्री-बोरवडे मतदार संघातील जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, दौलतवाडीचे माजी सरपंच व तंटामुक्त अध्यक्ष श्रीकांतराव भोसले, कागल पंचायत समितीचे सभापती जयदिप पोवार यांच्या शुभहस्ते … Read more

कागलसह परिसरातील श्रीगणेश मूर्तींचे भक्तिभावाने विसर्जन

350 किलो निर्माल्य गोळा करून खत निर्मितीसाठी पाठवले कागल / प्रतिनिधी : कागलसह परिसरातील श्रीगणेश मूर्तींचे मोठ्या भक्तिभावाने विसर्जन केले. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आम्हाला,या भावनीक गीताने व ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…’ जय घोषात मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. दूधगंगा नदी तसेच खाणीमध्ये गणेश मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. … Read more

शिवराज’ची अर्चना पाटील ठरली वेगवान खेळाडू

मुरगूड ( शशी दरेकर ) : देवचंद कॉलेज अर्जुननगर येथे झालेल्या कागल तालुकास्तरीय शालेय शासकीय मैदानी स्पर्धेमध्ये येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मुरगुडची विद्यार्थिनी कु. अर्चना विनोद पाटील ही १४ वर्षाखालील वयोगटात कागल तालुक्यात सर्वात वेगवान मुलगी ठरली. ती २०० मी. धावणे मध्ये उपविजेती ठरली. याशिवाय या शाळेची विभा … Read more

युथ सर्कल मुरगुड यांच्या वतीने गणेश उत्सव निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगुड येथील युथ सर्कल मुरगूड यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले यामध्ये संगीत खुर्ची ,महिला संगीत खुर्ची, व लिंबू चमचा अशा विविध गटात स्पर्धा घेण्यात आल्या .तसेच या मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व नुकतीच कुस्ती स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले राजवर्धन पुजारी व ऋषिकेश डेळेकर यांचा सत्कार माजी उपनगराध्यक्ष संतोषकुमार … Read more

नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन व अशासकीय संस्थांनी एकत्र यावे – डॉ. ज्ञानेश्वर मुळ्ये (सदस्य, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग)

चांगुलपणाची चळवळ परिवारासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात विचारमंथन बैठक कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) :  शासन-प्रशासन, सुज्ञ नागरिक, उद्योजक, शेतकरी तसेच सामाजिक संस्था यांनी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र यायला हवे. सामाजिक कार्यात प्रशासनाची भूमिका महत्वाची असून त्यांच्या सहकार्याने सामाजिक संस्था प्रत्येक क्षेत्रात सामाजिक बांधिलकीतून काम करतील असे प्रतिपादन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ.ज्ञानेश्वर मुळ्ये यांनी केले. ते चांगुलपणाची चळवळ … Read more

‘सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम’ स्पर्धेत पाटगावला राष्ट्रीय स्तरावर कांस्य श्रेणीतील प्रमाणपत्र

कोल्हापूर, दि. 27 (जिमाका) : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या ‘सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम’स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील ‘मधाचे गाव पाटगाव’म्हणून विकसित होत असलेले ‘पाटगाव’हे कांस्य श्रेणीतील प्रमाणपत्र विजेते गाव ठरले आहे. राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठित स्पर्धेत महाराष्ट्रातून एकमेव पाटगावची निवड झाली आहे.    नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अजय भट्ट व पर्यटन … Read more

कॅन्सर रोखण्यास तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थाविरुध्द जनजागरण गरजेचे – डॉ. रेश्मा पवार

मुरगूड ( शशी दरेकर ) – तंबाखू आणि तंबाखूजन्य गुटखा,मावा इ.च्या सेवनाने कॅन्सर रुग्णांचे प्रमाण आपल्या राज्यात,त्यातही पश्चिम महाराष्ट्रात वेगाने वाढत आहे. पूर्वी हे रुग्ण वयाच्या चाळीशी-पन्नाशीनंतर आढळत.सध्या हे प्रमाण तरूण वयात,विशीनंतरच मोठ्या प्रमाणात आढळत आहे. ही अत्यंत चिंतेची गोष्ट आहे. त्यासाठी तंबाखूजन्य पदार्थ सेवनाविरूध्द व्यापक सामाजिक प्रबोधनाची आणि जनजागरण करण्याची गरज आहे. ” असे … Read more

वाघापूर उपसरपंच पदी सागर कांबळे यांची बिनविरोध निवड

मडिलगे (जोतीराम पोवार) – वाघापूर तालुका भुदरगड येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सागर गणपती कांबळे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच बापूसो रामचंद्र आरडे हे होते यावेळी मावळत्या उपसरपंच सौ संगीता शिवाजी शिंदे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदी सागर कांबळे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नेताजी आरडे, सौ … Read more

error: Content is protected !!