
350 किलो निर्माल्य गोळा करून खत निर्मितीसाठी पाठवले
कागल / प्रतिनिधी : कागलसह परिसरातील श्रीगणेश मूर्तींचे मोठ्या भक्तिभावाने विसर्जन केले. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आम्हाला,या भावनीक गीताने व ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…’ जय घोषात मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. दूधगंगा नदी तसेच खाणीमध्ये गणेश मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. कागल नगरपालिकेने विसर्जनाचे नेटके नियोजन केले होते.
कागल परिसर तसेच कर्नाटकातील कोगनोळी भागातील मंडळांच्या श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन दूधगंगा नदीमध्ये मोठ्या भक्ती भावाने करण्यात आले. कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी नितीन कांबळे व त्यांचा 75 कामगारानी दूधगंगा नदी तसेच खनीमध्ये श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी नेटके नियोजन केले होते. मोठ्या गणेश मूर्तींसाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. पालिकेने मंडळांना मूर्तीदांनचे आवाहनानुसार 11 मंडळांनी मूर्ती दानला प्रतिसाद दिला.
कागल पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. सर्व मंडळांना रात्री दहा वाजेपर्यंत श्री गणेश मूर्ती विसर्जनाचे आवाहन पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी केले होते. रात्रीच्या वेळी गणेश मूर्ती विसर्जनासाठी प्रकाश झोताची व्यवस्था करण्यात आली होती.
दरम्यान कागल नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी श्रीराम पवार यांचे आवाहनानुसार कागल शहरातील स्थानिक मंडळांनी मूर्ती दान करून पर्यावरण पूरक विसर्जनास पसंती दिली. तसेच नदीघाट आणि कारखाना खण येथे 350 किलो निर्माल्य गोळा करून खत निर्मिती करता घनकचरा प्रकल्प येथे पाठविणेत आले.
या प्रसंगी आरोग्य अधिकारी नितीन कांबळे,अग्निशमन अधिकारी बाळासाहेब माळी ,पॉल सोनूले ,सुरेश शेळके,अमित गायकवाड,प्रकाश पाटील,रोहित माळी,विजय पाटील,बादल कांबळे ,आशिष शिंगण तसेच आरोग्य विभाग कर्मचारी, अग्निशमन कर्मचारी, ऍम्ब्युलन्स विभाग कार्यालयीन कर्मचारी अधिकारी जवळ जवळ 50 एक अधिकारी कर्मचारी नेमून विसर्जन व्यवस्था कार्यरत ठेवली होती.