मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल बाजारपेठ येथे नव्यानेच सुरू केलेल्या २४ तास सेवा उपल्ब्ध करून देणाऱ्या युनिटी फार्मा मेडीकल मॉलचा शानदार उदघाटन समारंभ नुकताच पार पडला.
उदघाटन समारंभास बिद्री-बोरवडे मतदार संघातील जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, दौलतवाडीचे माजी सरपंच व तंटामुक्त अध्यक्ष श्रीकांतराव भोसले, कागल पंचायत समितीचे सभापती जयदिप पोवार यांच्या शुभहस्ते युनिटी फार्माचे उदघाटन व उपस्थितीत मान्यवरांचे हस्ते पार पडले.
याप्रसंगी मुरगूड रुग्णालयाचे डॉ . भगवान डवरी व आजरा तालुक्यातील सरकारी दवाखान्याचे प्रमुख डॉ. अमोल पाटील व अनेक मान्यवर उपस्थित होते.
या २४ तास सेवा उपलब्ध करुन दिल्याबद्दल मॉलच्या सुधीर कांबळे यानीं दाखवलेल्या सेवेचे आविष्काराबद्दल कौतूक करून अनेक मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. या उदघाटन प्रसंगी मान्यवरांच्या सह अनेक नागरीक, हॉस्पीटलमधील कर्मचारी वर्ग , मोठया संख्येने उपस्थित होते.