मुरगूड (शशी दरेकर) – मुरगूड ( ता. कागल ) येथे बाजारपेठत शिवप्रेमीतर्फे भारतरत्न “लता मंगेशकर “यानां भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी शिवप्रेमी श्री. धोंडीराम परीट यानीं आपल्या मनोगतात लतादीदींच्या आठवणीनां उजाळा दिला. अनेक मधूर गाण्यानीं दीदीनी श्रोत्यानां मंत्रमुग्ध केले.

अत्यंत सुरेल आवाजाची दैवी देणगी लाभलेल्या विश्वविख्यात भारतीय चित्रपट संगीतातील युगप्रवर्तक व सर्वश्रेष्ठ प्रार्श्वगायिका लतादीदींच्या निधनाने आम्ही पोरके झालो आहोत. या श्रध्दांजली प्रसंगी -सनी गवाणकर, सुभाष वंडकर, विजय गोधडे, अमर गिरी, विशाल सुर्यवंशी (नगरसेवक), शशी दरेकर, संजय वारके, शिवभक्त धोंडीराम परीट, मधूकर मंडलीक ( गुरुजी ), अमित दरेकर, उद्धव मिरजकर, शिवाजी चित्रकार, प्रविण रणवरे उपास्थित होते.
.