बातमी

वंदूर येथे बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला

कागल (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील वंदूर येथे बिबट्या आढळून आल्याने गावकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शेतकरी शिवाजी पाटील हे गवत कापण्यासाठी गेले असता झाडावर बसलेला बिबट्या त्यांनी पाहिला. बिबट्याने खाली उडी मारताच या शेतकऱ्याचा थरकाप उडाला.बिबट्याने भुकणाऱ्या कुत्र्यावर हल्ला केला. त्यानंतर कुत्र्याला पकडून ऊसात पाळाला. यानंतर शेतकरी आरडाओरडा करत पळत सुटले. ही घटना समजतात गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनास्थळी पोलिस आले व त्यांनी वन विभागाला याबाबतची माहिती दिली. बिबट्या आल्याचे समजताच नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. दोन कुत्री खाल्ल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी शेतामध्ये जाऊ नये यासाठी गावात दवंडी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *