कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : माहे डिसेंबरचा महिला लोकशाही दिन सोमवार दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजीसकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पी.बी.शिर्के यांनी दिली आहे.
लोकशाही दिनास महिलांनी आपल्या तक्रारी, अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणुक कराव्यात. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा व आस्थापना विषयक बाबी, सामुहिक स्वरुपाच्या तक्रारींचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी, असेही श्री. शिर्के यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.