बातमी

युथ सर्कल मुरगुड यांच्या वतीने गणेश उत्सव निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगुड येथील युथ सर्कल मुरगूड यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले यामध्ये संगीत खुर्ची ,महिला संगीत खुर्ची, व लिंबू चमचा अशा विविध गटात स्पर्धा घेण्यात आल्या .तसेच या मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व नुकतीच कुस्ती स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले राजवर्धन पुजारी व ऋषिकेश डेळेकर यांचा सत्कार माजी उपनगराध्यक्ष संतोषकुमार वंडकर व अध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.

महाप्रसाद, आणि दिग्विजयसिंह पाटील यानीं श्री. ची मूर्ती दिली. या स्पर्धेवेळी राजेंद्र नानासाहेब चव्हाण व नेक्स्ट मराठी या चॅनेलवर रिपोर्टर म्हणून काम करणारे राजू चव्हाण यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुहासिनी पाटील तर प्रमुख पाहुणे महादेव वागवेकर, धोंडिराम चव्हाण, बळीराम डेळेकर, तुकाराम वंडकर हे होते.

कुमार ज्योतीराज प्रविणसिंह पाटील यांचा जन्म अनंत चतुर्थी दिवशी झाल्या मुळे गेली 16 वर्षे महीला व सर्व सभासदांच्या वतीने वाढदिवस साजरा केला जातो व त्यांच्या वतीने प्रसादाचे आयोजन करण्यात येते

स्वागत नगरसेवक राहुल वंडकर यांनी केले तर प्रास्ताविक राजू चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन नंदिनी सारंग यांनी तर आभार शुभम वंडकर यांनी मांनले या वेळी विलास डेळेकर, सचिन चव्हाण ओंकार वंडकर,आक्षय गळपासे, विशाल नलवडे, अक्षय डेळेकर, योगेश सारंग व मंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *