किरीट सोमय्याचा केला निषेध
कागल(विक्रांत कोरे) : महाराष्ट्राचे कर्तबगार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर शंभर कोटी रूपयांचा अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची घोषणा केली आहे. यासाठी न्यायालयात ठरावीक रक्कम भरावी लागणार आहे . म्हणुन वंदुर ता.कागल ग्रामस्थ पाच लाख रूपये गोळा करून मंत्री मुश्रीफ यांना देणार आहोत. असे प्रतिपादन संजय घाटगे गटाचे प्रमुख कार्यकर्ते आणि कागल तालुका संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष धनराज घाटगे यांनी केले.
वंदुर ता.कागल येथे किरीट सोमय्यांचा जाहीर निषेध करून प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला. यावेळी घाटगे बोलत होते. जनतेसाठी शेतकरी वर्गासाठी, बेरोजगारांसाठी, एकादी संस्था आणि प्रकल्प ऊभारणे आणि ती चालवीणे सोपे नाही. मुबंईत एसीत बसुन खासदारकी उपभोगणारया सोमय्या यांना ग्रामीण भागातील रोजगाराचे महत्व माहीत नाही असे घाटगे म्हणाले. यावेळी, बबन खोडवे, उत्तम कांबळे यांनी आपल्या मनोगतात कागल तालुक्याच्या राजकारणात आमचे नेते हसन मुश्रीफ यांना सर्वात जास्त विरोध आणि धारदर संघर्ष माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनीच केला. मात्र आता राजकीय मैत्रीचा धर्म निभावीत मुश्रीफाना साथ देण्यासाठी तातडीने पुढे आले आहेत. ही बाब कागल तालुक्यातील जनता आयुष्यभर विसरणार नाही.कारण कोण कुठला परप्रांतीय किरीट सोमय्या महाराष्ट्रातील एका लोककल्याणकारी नेतृत्वावर बोलतो. हा कोल्हापुर जिल्ह्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे. कागल तालुक्याच्या स्वाभिमानाचा विषय आहे.यावेळी कुंडलिक खोडवे यांनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी राष्ट्रीय काॅग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बबन खोडवे, उत्तम कांबळे,तानाजी बागणे,अनिल गुरव ,शिवाजी बागणे, कुंडलिक खोडवे आदी मान्यवर उपस्थित होत.