बातमी

वाघापूर उपसरपंच पदी सागर कांबळे यांची बिनविरोध निवड

मडिलगे (जोतीराम पोवार) – वाघापूर तालुका भुदरगड येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सागर गणपती कांबळे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच बापूसो रामचंद्र आरडे हे होते यावेळी मावळत्या उपसरपंच सौ संगीता शिवाजी शिंदे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदी सागर कांबळे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य नेताजी आरडे, सौ सुनीता शिंदे, सौ शोभा बरकाळे, सौ दिपाली दाभोळे, सौ सुमन एकल, सौ संगीता गुरव, युवराज आरडे, आनंदा एकल, सौ जयश्री दाभोळे यांच्यासह बिद्रीचे संचालक अशोक कांबळे, रिपब्लिक पक्षाचे तालुकाध्यक्ष बबन कांबळे, धनाजी बरकाळे, आनंदा घाटगे, तानाजी कुरडे, किरण कुरडे, समाधान कुरडे, जयवंत कांबळे, बाळासो कांबळे, रघुनाथ कांबळे, राजाराम कांबळे, रंगराव आरडे, कामगार सेलचे तालुकाध्यक्ष बाळासो शिंदे, ग्रामसेवक तानाजी शिंदे सचिव दयानंद कांबळे, तलाठी जरग पोलीस पाटील दत्तात्रय घाटगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *