९ चारचाकी व ५ दुचाकीचा समावेश
मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड येथील ‘सुवर्णमहोत्सवी श्री लक्ष्मी नारायण नागरी सह. पत संस्थेतर्फे नवीन वाहन खरेदी योजनेअंतर्गत ९० लाख रुपये खर्चाच्या १४ वाहनाचे वितरण संस्थेतर्फे करण्यात आल्याची माहिती संस्थेचे नुतन सभापती श्री किशोर विष्णूपंत पोतदार यांनी दिली.
संस्थेच्या विविध शाखात घेण्यात आलेल्या नूतन वाहन कार्यक्रमातून कर्जदाराचे वाहन पूजन व वाहनाच्या चाव्या वितरणांचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आल्याचे सांगून श्री पोतदार म्हणाले ” वितरीत नवीन वाहनामध्ये ९ चारचाकी व ५ दुचाकी वाहनाचा समावेश आहे. “
यावेळी उपसभापती श्री दतात्रय कांबळे , ज्येष्ठ संचालक श्री. जवाहर शहा , सर्वश्री संचालक श्री. पुंडलीक डाफळे , श्री. दत्तात्रय तांबट, श्री अनंत फर्नांडीस, चंद्रकांत माळवदे, विनय पोतदार, रविंद्र खराडे, रविंद्र सणगर, संचालिका सौ सुजाता सुतार, सौ. सुनिता शिंदे, तज्ञ संचालक जगदीश देशपांडे , श्रीमती भारती कामत, कार्यलक्षी संचालक श्री नवनाथ डवरी सचिव मारुती सणगर, सर्व शाखाधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होते.
- शाखावार वाहन कर्ज पुढील प्रमाणे :
- शाखा कापशी (ता. कागल) एकून कर्ज वितरण ४० लाख ३५ हजार .
- शाखा सावर्डे (ता. कागल) एकूण कर्ज वितरण २५ लाख ६ हजार .
- शाखा सरवड़े तो राधानगरी – एकूण कर्ज वितरण १० लाख ६२ हजार .
- शाखा मुरगूड ता कागल – एकूण कर्ज वितरण १५ लाख ७५ हजार