नोकरी बातमी

उद्योजक, नियोक्त्यांनी रोजगार पोर्टल वर माहिती अद्ययावत करावी

कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : जिल्ह्यातील खाजगी,शासकीय व निमशासकीय आस्थापनांनी महास्वयम वेबपोर्टल https://rojgar.mahaswayam.gov.in वर आपल्या आस्थापनेचे Registration ID आणि Password नोंदवून लॉगिन करावे. तसेच या प्रोफाईल मध्ये अपूर्ण असलेली माहिती तात्काळ अद्यावत करावी. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या रोजगार पोर्टलचे केंद्र शासनाच्या एनसीएस पोर्टलशी इंटिग्रेशन करण्याची कार्यवाही सुरु आहे. यामध्ये उद्योजक, नियोक्ते यांचा डाटा एनसीएस पोर्टलवर पोर्ट करत असताना उद्योजक, नियोक्ते यांच्या डाटामध्ये Industry Sector, First Name, Last Name, Nature of work Id, Organisation Pan / Tan, City , Mobile No., Email id, Contact No., Etc माहिती उपलब्ध नसल्याबाबत महास्वयम वेबपोर्टलच्या तांत्रिक तज्ज्ञांनी कळविले आहे. माहिती उपलब्ध नसल्याने या उद्योजक नियोक्त्यांची माहिती एनसीएस पोर्टलवर पोर्ट होण्यास अडचण येत आहे. माहिती नोंदवताना अडचण आल्यास किशोर जाधव – ७९७७५३८१२९ यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *