मुरगूड ( शशी दरेकर ) – येथील श्री. दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची या गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसाला ‘एफआरपी’ प्रमाणे विनाकपात प्रतिटन ३२०० रुपये दर देण्यात येणार आहे. तसेच उत्पन्न विभागणी सुत्रानुसार होणारी वाढीव रक्कम देणे बाबत नवीन संचालक मंडळ निर्णय घेईल. अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी दिली. कारखान्याच्या ६१ व्या ऊस गळीत हंगामाच्या शुभारंभा वेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई होते. यावेळी कारखान्याचे जेष्ठ कर्मचारी व अधिकारी यांच्या हस्ते गव्हाणीत ऊस मोळी टाकून गळीताचा शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी कार्यकारी संचालक के. एस. चौगले व त्यांच्या पत्नी राधिका चौगले या उभयंताच्या हस्ते गव्हाण पुजन करण्यात आले. तसेच ऊस तोडणीचा प्रारंभ मुख्य शेती अधिकारी बी. एन. पाटील व ऊस वजन काट्याचे पूजन वर्क्स मॅनेजर एस. बी. भोसले यांच्या हस्ते झाले. कार्यकारी संचालक श्री. चौगले म्हणाले, यावर्षी १० लाख ऊस मेट्रीक टनाचे गाळप करण्याचे उदिष्ट असून हंगामपूर्व मशिनरी देखभाल दुरुस्ती व तोडणी यंत्रणेचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. ऊस तोडणी व वहातुकीसाठीचे करार पूर्ण झाले आहेत.

ऊस तोडणीच्या ३७५ कायम स्वरूपी टोळ्या बांधल्या आहेत. तर सुमारे ६०० स्थानिक ऊस वाहनांची उपलब्धता करण्यात आली आहे. सभासद बंधू भगिनी व ऊस उत्पादकानी पिकविलेला सर्व ऊस कारखान्यास गळीतास पाठवून सहकार्य करावे. कारखान्याकडे ठेवलेल्या ऐच्छिक ठेवींवरील १० टक्के प्रमाणे होणाऱ्या व्याजाची रक्कम संबंधिताच्या खात्यावर जमा केली आहे. ज्या ठेवीदारांनी खात्याची माहिती कळविली नाही त्यांनी कारखान्याशी संपर्क साधून व्याजाचे धनादेश घ्यावेत.
यावेळी कामगार संचालक शिवाजी केसरकर यांचे भाषण झाले. कार्यक्रमास सेक्रेटरी एस. जी किल्लेदार, चिफ अकौंटट एस. ए. कुलकर्णी, को-जन मॅनेजर व्ही. के. मिरजी, प्रोजेक्ट मॅनेजर महेश सलगर, चिफ केमिष्ट पी. पी. शिंदे, लेबर ऑफिसर शिवराज मोरे, सिव्हील इंजिनिअर बी. बी. पाटील, कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय मोरबाळे यांच्यासह खाते अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन सतिश घोरपडे यांनी केले. आभार एस. जी. किल्लेदार यांनी मानले.
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.