बातमी

मुरगूडमध्ये किरीट सोमय्यानां प्रवेशबंदी करा ; मुरगूडच्या राष्ट्रवादी काँगेसचे मुरगूड पोलीस ठाण्यास निवेदन


मुरगूड : (शशी दरेकर)
राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर खोटेनाटे आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची मने दुखावणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या मुरगूड पोलिस स्टेशन येथे भेट देणार आहेत. मुरगुड शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी किरीट सोमय्या यांना मुरगूड शहरात प्रवेश बंदी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पत्रकार परिषदेत करण्यात आली.

मुरगुड ता कागल येथे सोमवार दिनांक 20 रोजी भाजपचे नेते किरीट सोमय्या मुरगूड पोलिस स्टेशन येथे येणार आहेत. शहरात त्यांना जनमानसातून विरोध होण्याची शक्यता आहे. त्यांचे वाहन शहरात अडवले जाऊ शकते. शांतता आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे किरीट सोमय्या यांना मुरगुड शहरामध्ये प्रवेश देऊ नये अशी कळकळीची विनंती करत आहोत. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार असेल अशा आशयाचे निवेदन मुरगूड शहर राष्ट्रवादी काँग्रेस कडून मुरगूड पोलिस स्टेशनला देण्यात आले.

यावेळी डी. डी. चौगले, शहराध्यक्ष रणजित सूर्यवंशी, सुधीर सावर्डेकर, राजू आमते, शिवाजी सातवेकर,-सुनील चौगले,संजय मोरबाळे, सम्राट मसवेकर, अशोक चौगले, रणजित मगदुम, अमोल मंडलिक, महनतेश पाटील, विक्रम घाटगे, शाहू फर्नाडिस,अमित तोरसे, समाधान चौगले, अविनाश परीट उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *