मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता. कागल येथिल दिपावलीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मुरगूड बाजारपेठ ग्राहकानी फुलून गेली आहे. मुरगूडमध्ये अनेक ठिकाणी आकाश कंदील, विद्युत रोषणाईच्या माळा , तयार फराळांचे, चिवडा-पोहे, लाडू कळी, कापड दुकाने, तयार कपडयांची दुकाने, किराणा दुकाने आकर्षक विद्युत रोषणाईने सजली आहेत.
त्याचबरोबर सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यानीही विविध योजना जाहिर केल्या असून ग्राहक आपल्याकडे ओढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. एकंदरीत मुरगूड बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत असल्याने या दिपावली सणाला मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता आहे.