बातमी

वंदूर ग्रामपंचायतीकडून गणेश मूर्ती व निर्माल्य दान उपक्रम

वंदूर (महेश कांबळे) : पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी वंदूर(ता. कागल) ग्रामपंचायतीच्या वतीने गणेश मूर्ती व निर्माल्य दान उपक्रम राबवण्यात आला. ग्रामपंचायतीच्या वतीने कृत्रिम कुंड तयार करून यामध्ये गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्या, सुमारे १५० हून अधिक गणेश मुर्ती व निर्माल्य यावेळी दान करण्यात आले. या उपक्रमासाठी सरपंच सविता हिरेमठ, बबन खोडवे, सागर बागणे, ग्रामविकास अधिकारी […]

बातमी

सिद्धनेर्लीत 1500 वर गणेश मूर्तीदान

सिद्धनेर्ली (लक्ष्मण पाटील)- येथे दूधगंगा नदी काठावर नागरिकांकडून विसर्जनासाठी आणलेल्या 1500 हुन अधिक मूर्ती व टन निर्माल्य दान जमा केले . समाज विकास केंद्र संचालिक ,स्वामी विवेकानंद अभ्यासिका , ग्रामपंचायत, राजश्री शाहू , सामाजिक समरसता मंच, शाहिद भगतसिंग विचार मंच ,निसर्ग व पर्यावरण संघटना यांच्यातर्फे 16 व्या वर्षी मूर्ती व निर्माल्य दान उपक्रम राबवला. यात […]

बातमी

विश्वेश्वरय्या यांचे बांधकाम क्षेत्रातील तंत्रज्ञान आजच्या पिढीला आदर्शवत – अभियंता प्रकाश पोतदार

मुरगूड ( शशी दरेकर ) : देशाच्या जलक्रांतीत मोलाचे योगदान भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी दिले आहे . देशाच्या विकासात त्यांचा परीसस्पर्श झाला असून आजच्या पिढीला त्यांचे बांधकाम क्षेत्रातील तंत्रज्ञान आदर्शवत आहे . असे प्रतिपादन मुरगूड -नगर परिषदेचे अभियंता प्रकाश पोतदार यांनी केले. मुरगुड येथील दि मुरगूड इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा […]

बातमी

गडहिंग्लज मध्ये भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून त्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी

गडहिंग्लज – धनंजय शेटके शहरात विविध ठिकाणी भटक्या कुत्र्यांची झुंड फिरत असून नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.शहरात बस स्थानक,आजरा रोड, संकेश्वर रोड,भैरी रोड मार्केट यार्ड परिसर अशा विविध ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर असून नागरीकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पहाटेच्या वेळी अनेक नागरिक बाहेर फिरण्यास पडतात.अशा वेळी ही भटकी कुत्री नागरीकांच्या वर हल्ला करण्याचा प्रयत्न […]

बातमी

वंदुर ग्रामस्थ मंत्री मुश्रीफांच्यासाठी पाच लाख रूपये गोळा करणार – धनराज घाटगे

किरीट सोमय्याचा केला निषेध कागल(विक्रांत कोरे) : महाराष्ट्राचे कर्तबगार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर शंभर कोटी रूपयांचा अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची घोषणा केली आहे. यासाठी न्यायालयात ठरावीक रक्कम भरावी लागणार आहे . म्हणुन वंदुर ता.कागल ग्रामस्थ पाच लाख रूपये गोळा करून मंत्री मुश्रीफ यांना देणार आहोत. असे प्रतिपादन […]

बातमी

किरीट सोमय्या यांना कोर्टाचा दणका; अब्रुनुकसानीच्या प्रकरणात कोर्टात हजर राहावं लागणार

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांविरोधात तक्रारी करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना मुंबईतील शिवडी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने खडे बोल सुनावले आहेत. किरीट सोमय्या यांनी 1 एप्रिल 2021 रोजी गृहनिर्माण विभागाचे अधिकारी प्रवीण कलमे यांना गृहनिर्माण विभागाचा सचिन वाजे म्हणून संबोधलं होतं. या टिप्पणीवर प्रवीण कलमे यांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात मानहानीचा दावा […]

बातमी

कर भरा आणि विमा संरक्षण मिळवा ; सिद्धनेर्ली ग्रामपंचायतची योजना

सिद्धनेर्ली (श्रद्धा पाटील) : सिद्धनेर्ली (ता.कागल) येथील ग्रामपंचायतीने ‘कर भरा आणि विमा संरक्षण मिळवा’ अशी अभिनव योजना मिळकत धारकांसाठी जाहीर केली आहे. संपूर्ण कर भरणाऱ्या नागरिकांना एक लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ बाराशे हून अधिक मिळकतधारकांना होणार आहे. याबाबतचा निर्णय नुकत्याच मासिक सभेत घेण्यात आला, अशी माहिती सरपंच दत्तात्रय […]

बातमी

गडहिंग्लज मध्ये गणरायाला भावपूर्ण निरोप

गडहिंग्लज – धनंजय शेटके पाच दिवस घरगुती पाहुणचार घेतलेल्या आपल्या लाडक्या बाप्पाला आज गणेश भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला.आज सकाळ पासूनच बाप्पाच्या विसर्जनाची लगबग घरोघरी सुरू होती.या साठी नगरपालिका प्रशासनाने जय्यत तयारी केेली होती.शहरात २२ विविध ठिकाणी कुंडाची सोय करून नदी घाटावर गर्दी होणार नाही याची दक्षता पालिका प्रशासनाने घेतली होती. त्याच बरोबर पोलीस प्रशासनाने देखील […]

बातमी

इंद्रजीत पाटील यांची जर्मनी येथे उच्चशिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल सत्कार

सिद्धनेर्ली : बामणी ता. कागल येथील इंद्रजीत मारुती पाटील यांची जर्मनी येथे अभियांत्रिकी विषयातील उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. त्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. हनुमान दूध संस्था व दूधगंगा पतसंस्थेमध्ये माजी चेअरमन सदाशिव मगदूम यांच्या हस्ते सत्कार केला. श्री. पाटील यांनी पुणे येथील विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर पुण्यातील थिसन ग्रुप मध्ये त्यांनी […]

बातमी

भक्तिमय वातावरणात कागलकरानी दिला गणपती बाप्पांना निरोप

कागल/ प्रतिनिधी : कागल सह परिसरात घरगुती गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले .गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गजरात पाच दिवसाच्या बाप्पास निरोप दिला. कागल नगरपालिकेने याहीवर्षी मूर्ती, निर्माल्य दान उपक्रम राबवला 625 मुर्त्या पालिकेकडे दान केल्या. तर दोन टन निर्माल्य संकलीत झाले. गेल्या पाच दिवसापूर्वी आलेल्या गणपती बाप्पा मुळे संपूर्ण कुटुंबे भक्तिरसात न्हाऊन […]