सिद्धनेर्ली : बामणी ता. कागल येथील इंद्रजीत मारुती पाटील यांची जर्मनी येथे अभियांत्रिकी विषयातील उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. त्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. हनुमान दूध संस्था व दूधगंगा पतसंस्थेमध्ये माजी चेअरमन सदाशिव मगदूम यांच्या हस्ते सत्कार केला.
श्री. पाटील यांनी पुणे येथील विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर पुण्यातील थिसन ग्रुप मध्ये त्यांनी चार वर्षे डिझाईन इंजिनीरिंग म्हणून काम केले आहे. जर्मनीमधील युनिव्हर्सिटी ऑफ कायझर्स लावटर्न येथे वाहन व्यवसायातील अत्याधुनिक तंत्रज्ञान या विषया संदर्भात असलेल्या दोन वर्षीय अभ्यासक्रमासाठी त्याची निवड झाली आहे. जगभरातून या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया घेतली जाते. त्यामधून ८० विद्यार्थ्यांची निवड होते. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी राजे बँकेचे चेअरमन एम. पी. पाटील, कृष्णात बाबर, पांडुरंग पोतदार ,जयराम मगदूम, साताप्पा मगदूम, अशोक पाटील, शिवाजी मगदूम आदी उपस्थित होते.