कागल : दि कागल एज्युेशन सोसायटी संचलित वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यांचे वतीने विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. संदीप मुरतले यांनी कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश व करिअर घडविण्याचा विविध कोर्सेस बद्दल पालकांना व विद्यार्थ्यांना जागरूक केले.
त्याचप्रमाणे पालकांना आपल्या पाल्यासाठी जागृत राहणे आवश्यकता जाणवून दिली. तसेच त्यांनी संस्था व महाविद्यालयाचा इतिहास व महाविद्यालयात असणाऱ्या विविध शैक्षणिक शाखांची व राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्याच बरोबर महाविद्यालयामध्ये उपलब्ध असलेल्या प्रवेश प्रक्रिया २०२४-२५ सुविधा केंद्राबद्दल व प्रवेश प्रक्रियेसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रे, उपलब्ध शिष्यवृत्ती विषयी माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले याच बरोबर फार्मसी क्षेत्रातील विविध संधी बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांचे आभार विभाग प्रमुख श्री रितुराज देसाई यांनी मानले. महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना अल्पोपहार आयोजन करण्यात आले होते. मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन ऍडमिशन विभाग प्रमुख शीतल कांबळे यांनी केले. करिअर मार्गदर्शन विद्यार्थी -पालक मेळाव्यासाठी दि. कागल एज्युकेशन सोसायटीचे संचालक मा.श्री.बिपिन माने, वाय. डी. माने कॅम्पसच्या संचालिका सौ.शिल्पा पाटील व प्रभारी प्राचार्य डॉ. संदीप मुरतले उपस्थित होते.