कागल(विक्रांत कोरे) : कागल तालुक्यातील मौजे सांगाव येथे शेत जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी. काठी व दगडाचा वापर झाल्याने दोन जण जखमी झाले आहेत.ही घटना रविवारी सकाळी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मौजे सांगाव येथील शेतात घडली. कागल पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
पोलीस ठाण्यातील माहितीनुसार महेश अण्णासो पाटील, निलेश अण्णासो पाटील, अंकुश मारुती पाटील ,मारुती ज्ञानू पाटील, सर्व राहणार मौजे सांगाव व दुसऱ्या कुटुंबातील तानाजी पाटील( वाडकर), राहुल पाटील (वाडकर ), रवींद्र पाटील (वाडकर ), शोभा पाटील (वाडकर) या दोन कुटुंबात शेतजमिनीचा वाद आहे.
रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नांगरट व खत विस्कटत असताना दोन कुटुंबात काठी व दगडाने हाणामारी झाली. या मारहाणीत राजू पाटील (वाडकर) व महेश पाटील हे दोघे जखमी झाले आहेत. कागल पोलीस ठाण्यात हाणामारीची दोन्ही गटाकडून परस्परविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्याआहेत .पुढील तपास हवालदार भाट हे करीत आहेत.
तंटामुक्त अभियान राबवायला हवे कारण समाजात लोकांमध्ये समजूतदारपणा कमी होत आहे