उत्पादनवाढीसाठी  शेतकऱ्यांना शाहूतर्फे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार – राजे समरजितसिंह घाटगे

बामणी येथे ड्रोन तंत्राद्वारे फवारणी प्रात्यक्षिकास शेतकऱ्यांचा प्रतिसाद  व्हनाळी:  सागर लोहार  ऊसाच्या उत्पादनवाढीसाठी  शेतकऱ्यांना शाहू कारखान्यामार्फत आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार आहे.असे प्रतिपादन  शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.   बामणी  ता.कागल येथे शाहू साखर कारखान्यामार्फत ज्ञानदेव तारदाळे  यांच्या ऊस पिकावर ड्रोन तंत्राद्वारे औषध फवारणीच्या प्रात्यक्षिकवेळी ते बोलत होते.या प्रात्यक्षिकास शेतकऱ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी … Read more

Advertisements

करनूर येथील दीड वर्षाच्या शिवतेजच्या हस्ते ज्यूस घेवुन संभाजीराजेनी सोडले उपोषण

कागल( विक्रांत कोरे ) : मराठा आरक्षणासाठी व इतर मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे 26 फेब्रुवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसले होते. त्यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर ,त्यांनी करनूर तालुका कागल येथील गिर्यारोहक शिलेदार अॅडव्हेंचर संस्थेचे संस्थापक- अध्यक्ष सागर नलवडे यांचा मुलगा कु. शिवतेज सागर नलवडे याच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडले. सलग तीन दिवस … Read more

केडीसीसी बँकेत १६ मृत शेतकर्‍यांच्या वारसांना विमा धनादेशांचे वाटप

अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ३२ लाखांच्या धनादेशाचे वाटप कोल्हापूर : मृत शेतकऱ्यांच्या वारसदारांना केडीसीसी बँकेत विमा रक्कमेच्या धनादेशांचे वाटप झाले. बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संचालक मंडळाच्या बैठकीत हे वितरण झाले. याबाबत अधिक माहिती अशी, बँकेने किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत स्वभांडवलामधून अडीच लाख शेतकऱ्यांचा प्रत्येकी दोन लाख … Read more

विज्ञान दिनानिमित्य सिद्धनेर्ली विद्यालयात विज्ञान आकृती रांगोळी प्रदर्शन

सिध्दनेर्ली : येथील सिद्धनेर्ली विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये विज्ञान आकृती रांगोळी प्रदर्शन सम्पन्न झाले. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्य याचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विज्ञान आकृतींच्या संकल्पना स्पष्टीकरणासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम घेतल्याचे विज्ञान प्रमुख संदीप वर्णे यांनी सांगितले. या अनोख्या प्रदर्शनामध्ये 27 विद्यार्थ्यांनी आपली कलाकृती सादर केली 550 विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन पाहून वैज्ञानिक दृष्टीकोन … Read more

मुरगूड येथील सकल मराठा समाजाचा खासदार संभाजीराजे यांच्या उपोषणास पाठिंबा

मुरगूड ( शशी दरेकर ): मराठा समाजाच्या मागण्यांसाठी शनिवारपासून खा. संभाजीराजे मुबईत आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी समाजबांधव कोल्हापुरात साखळी उपोषणास बसले आहेत या आंदोलनास पाठिंबा म्हणून मुरगूड येथील सकल मराठा समाज आणि मुरगूड शहरातील नागरिकांनी फेरी काढून बस स्थानकाजवळ बैठे आंदोलन केले. एक मराठा लाख मराठा ,मराठा आरक्षण आमच्या … Read more

करनूर येथून पितळी बंब चोरीस

कागल ( विक्रांत कोरे): करनूर ता. कागल येथून पाणी गरम करण्याचे पितळी दहा बंब चोरीस गेले. हा प्रकार रविवार दि. 27 रोजी रात्री च्या दरम्यान घडला.चोरीचे ब-याच दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे नागरिकातून भितीचे वातावरण पसरले आहे. गेल्या दोन वर्षापासून करनूर मध्ये कोणत्या ना कोणत्या वस्तूंच्या चोरीचे सत्र चालू आहे. यामध्ये दोन ते तीन जातिवंत म्हैशी … Read more

अवचितवाडी येथे ” स्वराज्य महोत्सव २०२२ ” स्पर्धेत नंदा गायकवाड मानाच्या पैठणीच्या मानकरी

मुरगूड ( शशी दरेकर ) : अवचितवाडी ( ता. कागल ) येथे स्वराज्य महोत्सव २०२२मध्ये विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या . यामध्ये . सिनेअभिनेते मदन पलंगे यांच्या खेळ खेळुया मानाच्या पैठणीचा कार्यक्रम महिलांच्या तोबा गर्दीत घेण्यात आला.होम मिनिस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या मानाच्या पैठणीच्या मानकरी नंदा गायकवाड ठरल्या. तर दुसरा -अंजना शिंदे , तिसरा -तृप्ती भारमल … Read more

मायबोली मुळे दऱ्या-खोऱ्यातील शिळानां जाग येते – उपप्राचार्य एस. पी. पाटील

मुरगूड ( शशी दरेकर ) : अमृताहून मधुर असा जिचा गौरव संत ज्ञानेश्वर माऊलींनी केला; जी आमुची मायबोली आहे; जिच्या संगतीने दऱ्या खोऱ्यातील शिळांना जाग येते अशा भाषेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या मराठी भाषा अद्याप ही अभिजात दर्जाच्या प्रतिक्षेत आहे. या भाषेला हा दर्जा प्रदान करुन ती ज्ञान भाषा व्हावी. असे मत मुरगूड विद्यालय … Read more

छत्रपती संभाजीराजे यांच्या आमरण उपोषणाला करनूर येथील सकल मराठा समाजाचा पाठिंबा देऊन एक दिवसाचे साखळी उपोषण

कागल( विक्रांत कोरे) : करनूर ता. कागल येथील सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदान येथे सुरू असणाऱ्या आमरण उपोषणास पाठिंबा देऊन, सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक दिवसीय साखळी उपोषण करण्यात आले. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून उपोषणास सुरुवात करण्यात आले. करनूर … Read more

नवाब मालिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – समरजितसिंह घाटगे

कागल(प्रतिनिधी): मंत्री नवाब मलिक यांनी हसीना पारकर यांच्याकडून खरेदी केलेल्या जमिनीचे पैसे दाऊद इब्राहिमने बॉम्बस्फोट करण्यासाठी वापरले हे कृत्य देशद्रोही आहे . त्यामुळे नवाब मलिक यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यायला हवा. मालिकांचा राजीनामा जोपर्यंत घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे दिला. ते पुढे म्हणाले, मंत्री अनिल देशमुख यांच्यावर … Read more

error: Content is protected !!