बातमी

“स्पंदन ” च्या सेल्फी विथ गुढी स्पर्धेत अशोक दरेकर प्रथम

मुरगूड ( शशी दरेकर ) : पाटण तालुक्यातील डाकेवाडी ( ता. काळगांव ) येथिल ” स्पदन ” चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या ” सेल्फी विथ गुढी ” या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून उस्फुर्त आणि उदंड प्रतिसाद मिळाला. ”चला संस्कृती जपूया ” ही टॅगलाईन घेऊन सेल्फी विथ गुढी ही आगळी -वेगळी स्पर्धा आयोजित केली होती.

या स्पर्धाचा निकाल नुकताच लागुन मुरगूडमधील व सध्या सातारा येथे वास्तव्यास असलेल्या श्री . अशोक दरेकर यानां प्रथम क्रमांक मिळाला आहे . व्दितीय क्रमांक अपर्णा नाईक ( नाशिक ) तर तृतीय क्रमांक दिंडे महाराज ( धामणी ) यानीं पटकावला . उत्तेजनार्थ क्रमांक – अनय धनंजय डोईफोडे , स्नेहा जगताप यानां देण्यात आले आहेत. या विजेत्या स्पर्धकाना आकर्षक गौरवचिन्ह, पुस्तक, आणि अभिमानपत्र देण्यात येणार आहे.

प्रथम क्रमांकाचे स्पर्धक अशोक दरेकर यानां यापूर्वी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार , राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार , राज्यस्तरीय आदर्श अभियंता पुरस्कार , मुंबई लेख स्पर्धा पुरस्कार , राज्यस्तरीय गुणीजनरत्न , महापरिषद मुंबई जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार यापूर्वी त्यानां मिळाले आहेत. सेल्फी विथ गुढी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकानां एका दिमाखदार सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यान येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *