कागल दि.१०( विक्रांत कोरे) : करनूर ता. कागल येथे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी बांधकाम खाते अंतर्गत गावातील लोकांना स्नेहभोजन तसेच बांधकाम कामगार कार्ड धारकांचे थम घेण्यात आले,वृद्धाश्रमातील लोकांना कपडे वाटप, ग्रामपंचायतीच्या वतीने एक हजार डस्टबिन वाटप करण्यात आले. या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. उपसरपंच इम्रान नायकवडी हे होते.
यावेळी बोलताना उपसरपंच प्रवीण कांबळे म्हणाले, करनूर च्या विकासात हसन मुश्रीफ यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी आपल्या मंत्रिपदाच्या माध्यमातून अनेक विकासकामे करनूर मध्ये केली आहेत. जनतेचे ते नेहमी हीच जोपासत आहेत. त्यांच्याकडे जी जी मंत्रिपदे आली त्या मंत्री पदांचा उपयोग त्यांनी दीनदलित, गोरगरीब उपेक्षितांचे हितच जोपासले. यावेळी पांडुरंग विकास सेवा संस्थेचे चेअरमन तातोबा चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत वैभव आडके यांनी केले.कार्यक्रमास सरपंच उल्फत समीर शेख, सौ. संगीता पोपटराव जगदाळे, सौ. रेश्मा राजमहंमद शेख, तानाजी भोसले, रोहन पाटील, बाळासो पाटील, बाबुराव धनगर, अण्णासो पाटील, भाऊसो नलवडे, रंगराव पाटील,अनिरुद्ध चौगुले, सुरेश परीट, युवराज शिंदे, बाळासो धनगर आदीं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व गावातील नागरिक व महिला उपस्थित होत्या.