बातमी

मुरगूडच्या श्री गणेश नागरी सह पतसंस्थेला २ कोटी ३९ हजार इतका विक्रमी नफा – चेअरमन उदयकुमार शहा

मुरगूड ( शशी दरेकर ) : कै. खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे कृपाशिर्वादाने स्थापन झालेल्या गणेश नागरी सह पतसंस्थेची अल्पावधीतच गरुड भरारी. संस्था सभासदांच्या विश्वासास पात्र ठरलेने २ कोटी ३९ हजार इतका नफा प्राप्त करू शकलो . तसेच ७८ कोटीचे वर ठेवी जमा झाल्याची माहिती चेअरमन श्री उदय कुमार शहा व कार्यकारी संचालक श्री राहुल शिंदे यांनी दिली.

संस्थेची स्थापना

सन १९८८ – ८९ मध्ये कै. खा . सदाशिवराव मंडलिक साहेब यांचे कृपाशीर्वादाने संस्थेची स्थापना करण्यात आली . पुढे अल्पावधीतच म्हणजे म्हणजे ३४ वर्षाच्या काळात संस्थेने प्रगतीची गरुड भरारी घेतली आहे. क्रियाशील संचालक मंडळ , विनम्र सेवक वर्ग व सभासदांचा संस्थेवरील विश्वास यामुळेच शक्य झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

संस्थेला सन २०२१ – २०२२ या अर्थिक वर्षामध्ये २ कोटी ३९ हजार रुपयाचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन उदयकुमार शहा यांनी दिली. ते पुढे म्हणाले , संस्थेच्या मुरगूड मुख्य कार्यालयासह केनवडे बिद्री व गारगोटी(ता. भुदरगड ) अशा इतर ३ शाखा सुरू आहेत . संस्थेचे पूर्ण व्यवहार हे संगणकीकृत असून संस्थेची मुरगूड येथे स्व – मालकीची सुसज्य इमारत आहे. संस्थेने ग्राहकांसाठी लॉकरची सुविधा उपलब्ध केलेली आहे. संस्थेची मार्च २०२२ अखेरची सांपत्तिक स्थिती पुढील प्रमाणे : एकून राखीव निधी ५ कोटी ७० लाख असून ७८कोटी ०६ लाख रुपये ठेवी जमा आहेत तर ६२ कोटी ४८ लाख रुपये कर्ज वाटप केले आहे. ( पैकी सोने तारण कर्ज २३ कोटी २६ लाख इतके आहे ) २५ कोटी २८ लाख रुपये गुंतवणूक केली आहे.

संस्थेची वार्षिक उलाढाल ५५३ कोटी ५ लाख आहे . तर संस्थेचे खेळते भांडवल ९४ कोटी ०८ लाख रू. इतके झाले असून अहवाल सालातसंस्थेस २ कोटी ३९ हजार रुपये इतका नफा झाला आहे. तर वसुल भाग भांडवल ३७ लाख ८९ हजार आहे . एन पी ए ० % असून थकबाकी ००. २५ % इतकी आहे संस्थेचा ऑडिट वर्ग ‘अ ‘असून सभासदांसाठी १५ % डिव्हीडंड व दिपावली निमीत ५ लिटर खाद्यतेल भेट म्हणून दिले जाते. यावेळी चेअरमन उदयकुमार शहा, व्हा.चेअरमन प्रकाश हावळ , सर्वश्री संचालक एकनाथ पोतदार , आनंदराव देवळे, मारुती पाटील, सुखदेव येरुडकर , सोमनाथ यरणाळकर, राजाराम कुडवे, आनंदा जालीमसर, दत्तू कांबळे, सौ. रूपाली शहा, ॲड.सौ. रेखा भोसले, कार्यकारी संचालक राहुल शिंदे यांचेसह पदाधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होते. संस्थेच्या प्रगतीच्या व भरभराठीच्या कार्यात सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, आणि हितचिंतक तसेच पदाधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *