चंद्रकांत पाटील, बहुजनांची माफी मागा – अँड.संदीप ताजने

महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य; बसपाची आक्रामक भूमिका मुंबई : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या अवमानजनक वक्तव्याने बहुजनांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.पाटील यांनी तात्काळ बहुजनांची माफी मागत नैतिकतेच्या आधारे मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,अशी संतप्त प्रतिक्रिया बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी शनिवारी व्यक्त केली.महाराष्ट्र हा केवळ फुले-शाहू-आंबेडकर आणि कर्मवीरांच्या पुरोगामी विचारांमुळे शिक्षित … Read more

पिंपळगाव खू येथील तरुणाची आत्महत्या

पिंपळगाव खु (आण्णाप्पा मगदूम) : पिंपळगाव खू येथील साईलराज भीमराव कांबळे(वय १८वर्ष) या तरुणाने शुक्रवारी रात्री दहा वाजता घराजवळील टेलरिंगच्या दुकानाच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. कागल पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. आत्महत्याचे कारण समजू शकले नाही.

कोल्हापूर जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन वाचन चळवळीला गती देणार – पालकमंत्री दीपक केसरकर

विविध विषयांवरील पुस्तके खरेदीची वाचकांना संधी कोल्हापूर : वाचन संस्कृती रुजण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबवून वाचन चळवळीला गती देणार असल्याची ग्वाही मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा ग्रंथोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून दूरदृश्यप्रणालीद्वारे मंत्री … Read more

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंदी आदेश लागू

आदेश दिनांक ०९ / १२ / २०२२ रोजी सकाळी ०७.०० वा. पासून ते दिनांक २३/१२/२०२२ रोजी रात्री २४.०० वा. पर्यंत अंमलात राहील. कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील कर्नाटकच्या हद्दीत कन्नड वेदीका संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील वाहनांना लक्ष्य करुन नुकसान करणेत आले आहे. त्या पार्श्वभुमीवर कोल्हापूर जिल्हयातील काही पक्ष/संघटना यांचेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटून महाराष्ट्र राज्यात व्यवसाय करणारे … Read more

कागल पंचतारांकित चौकात कार व दुचाकीचा भीषण अपघात

कागल(विक्रांत कोरे) : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत मेट्रो हायटेक जवळील चौकात इनोव्हा कार व दुचाकीला भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी वरील दोघे व इनोव्हा कार मधील चालक असे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तर कार मधील इतर चौघेजण जखमी आहेत. जखमीना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोटरसायकल वरील सोनु कुमार,पंकज कुमार … Read more

महा आवास अभियान ग्रामीण : सर्व संबधित घटकांनी विशेष प्रयत्न करुन पुणे विभाग राज्यात अग्रेसर करावा – अपर आयुक्त अनिल रामोड

पुणे : महा आवास ग्रामीण अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व संबधित घटकांनी विशेष प्रयत्न करुन पुणे विभाग राज्यात अग्रेसर करावा, यासाठी प्रसंगी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत आणि केंद्र व राज्य शासनाची महत्वाकांक्षी असलेली ‘सर्वांसाठी घरे’ योजना यशस्वी करावी. त्यामुळे गरीब व सामान्य जनेतेचे घराचे स्वप्न पूर्ण होईल, असे आवाहन अपर विभागीय आयुक्त अनिल रामोड यांनी येथे केले. … Read more

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोमवारी शिकाऊ उमेदवारी भरती

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये ‘पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप मेला’ (PMNAM) अंतर्गत शिकाऊ उमेदवारी भरती तथा रोजगार मेळावा सोमवार दिनांक 12 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा येथे आयोजित केला असल्याची माहिती मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राचे अंशकालीन प्राचार्य महेश आवटे यांनी दिली. मेळाव्यास जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील किमान 50 नामांकीत आस्थापना सहभागी होणार आहेत. … Read more

शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेजची साक्षी गोरूले हिची जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड

मुरगुड (शशी दरेकर) : मुरगूड येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेजच्या सायन्स विभागाची विद्यार्थिनी साक्षी अशोक गोरूले हिची येत्या १९ डिसेंबर रोजी कोल्हापूरच्या महावीर कॉलेजवर होणाऱ्या जिल्हास्तरीय तायक्वानदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सिद्धनेर्ली येथे झालेल्या कागल तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ४६ ते ४९ वजनगटात तीने अजिंक्यपद पटकावल्याने तिची या स्पर्धेसाठी निवड झाली … Read more

मुरगूडमध्ये वाढीव घरफाळा निषेधार्थ भाजप व मुरगूडवाशिया तर्फे नगरपरिषदेवर मोर्चा

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड शहरातील मिळकतधारकांच्या मालमत्ता करात (घरफाळा) प्रचंड वाढ झाल्याच्या निषेधार्थ बुधवारी भाजपच्या व मुरगूडवाशियांच्या वतीने मुरगूड नगरपालिकेवर मोर्चा काढून घरफाळा वाढीस विरोध दर्शविण्यात आला. दर चार वर्षांनी होणाऱ्या मूल्यांकनाद्वारे मुरगूड शहरातील घरांना घरफाळा आकारणी करण्यात आली आहे. घरगुती, व्यापारी व औद्योगिक अशा वर्गीकृत रचनेद्वारे ही आकारणी करण्यात आली आहे. मात्र ती … Read more

मुरगूड येथील श्री. व्यापारी नागरीच्या मु .तिट्टा शाखेचा वर्धापनदिन उत्साहात

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल सर्वांच्या परिचयाची व विश्वसनिय पतसंस्थेच्या मुदाळ तिट्टा शाखेचा १७ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.सकाळी सौ .व श्री . प्रकाश धों. सणगर यांच्या शुभहस्ते ” श्री . सत्यनारायण पूजा पार पडली. सभासद, ठेवीदार, हितचिंतकानीं यावेळी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी श्री. व्यापारी नागरी सह . … Read more

error: Content is protected !!