नोकरी

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोमवारी शिकाऊ उमेदवारी भरती

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये ‘पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप मेला’ (PMNAM) अंतर्गत शिकाऊ उमेदवारी भरती तथा रोजगार मेळावा सोमवार दिनांक 12 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा येथे आयोजित केला असल्याची माहिती मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राचे अंशकालीन प्राचार्य महेश आवटे यांनी दिली.

मेळाव्यास जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील किमान 50 नामांकीत आस्थापना सहभागी होणार आहेत. आयटीआय उत्तीर्ण व शिकाऊ उमेदवारी उत्तीर्ण तसेच इतर पदवी व पदविकाधारक, दहावी पास, नापास उमेदवारांनी मार्कलिस्ट व आधारकार्ड घेवून मेळाव्यास उपस्थित रहावे. प्रशिक्षणार्थ्यांनी  https://dgt.gov.in/appmela2022/candidate_registration.php या संकेतस्थळावरुन ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असल्याचेही श्री.आवटे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *