बातमी

लढवय्या कार्यकर्ता हरपला

मदतीसाठी केव्हाही हाक द्या बंदा हाजीर. तसेच मनमिळाऊ, हसमुख, लढवय्या अशी सर्वसामान्यांत आपली ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे लिंगनूर गावचे प्रतिष्ठीत संदीप बावचे हे होत. धार्मिक पर्यटनासाठी गणपतीपुळे या ठिकाणी गेले असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि लिंगनूरवासीयांच्या काळजाला चटका बसला. संदीप यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक निधन झाल्याने कागल तालुक्यातील संबंध पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे शिलेदार म्हणून हसन मुश्रीफ यांचा दबदबा आहे. मुश्रीफ साहेबांचा विश्वास संपादन करणारे व त्यांच्यासाठी झटणारा संदीप बावचे हे पट्टीचा कार्यकर्ता म्हणून ओळखले जात होते. जनतेच्या अडी-अडचणी सोडवणे, प्रत्येकाच्या मदतीला धाऊन जाणे हे संदीप यांच्या स्वभावातच होते. म्हणूनच त्यांच्या निधनाची वार्ता समजताच लिंगनूरमध्ये त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जनसमुदाय लोटला होता. संदीप बावचे यांचे अकाली जाणे हे मनाला न पटणारी घटना आहे. तरीही त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्यासाठी परमेश्वराने शक्ती व धैर्य देवो. संदीप यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. संदीप बावचे यांना समस्त लिंगनूरवासीयांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली..!

  • शैलेश कांबळे
    (उपसंपादक – गहिनीनाथ समाचार, कागल)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *