बातमी

11 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रीय लोक आदालतीचे आयोजन –
सहभागी होण्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे आवाहन

उजळाईवाडी(नंदकिशोर धुमाळ) : कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कोल्हापूर यांचे वतीने 11 डिसेंबर 2021 रोजी शनिवारी मा.श्रीमती व्ही.व्ही.जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा,कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील औदयोगिक न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय आणि शाळा न्यायाधिकरण येथे आभासी तंत्रज्ञान व प्रत्यक्षरित्या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करणेत आले आहे .
जिल्हा व सत्र न्यायालय, कोल्हापूर तसेच सर्व तालुका न्यायालय कळे खेरीवडे, मलकापूर , पन्हाळा , कागल , कुरुंदवाड , इचलकरंजी , आजरा , चंदगड , गडहिंगलज , जयसिंगपूर , पेठवडगाव , राधानगरी येथे आयोजीत राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील तडजोडीस पात्र व प्रलंबीत वाद तसेच दाखलपूर्व प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत. यासाठी पक्षकार , अधिवक्ता तसेच नागरिकांनी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोठ्या प्रमाणात आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढावीत असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव , मा .श्री . पंकज देशपांडे यांनी केले आहे.

राष्ट्रीय लोक अदालत मध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे ,१३८ एन . आय. ॲक्ट प्रकरणे , भुसंपादन प्रकरणे , कौटुंबिक प्रकरणे , मोटर वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे , बॅंकेशी संबधीत प्रकरणे तसेच वाद दाखलपूर्व प्रकरणांमध्ये टेलिफोन, मोबाईल कंपनी संबंधीत वाद , महाराष्ट्र राज्य वीज वितरण प्रकरणे इत्यादी प्रकरणांचा समावेश यामध्ये असणार आहे. राष्ट्रीय लोक अदालतमध्ये पक्षकारांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार असून दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये झालेल्या न्याय निवाड्याचे तडजोडीने समाधान दोन्ही पक्षकारांना होत असते . कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व पक्षकार , अधिवक्ता आणि न्यायालयातील कर्मचारी व पॅनल सदस्य यांचे सुरक्षितेच्या दुष्टीकोनातून व्हॉटसप व आभासी तंत्रज्ञानाव्दारे संबंधीत पक्षकारांची ओळख आधीच निश्चित करून लोकन्यायालयाच्या दिवशी तडजोडीमधील अटी व शर्ती नोंदविता येण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आलेली असून त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ सर्वांनी घेणेचे आवाहन कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मा. श्री.पंकज देशपांडे यांनी केले आहे . अधिक माहिती करीता ०२३१-२५४१२९५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *