मुरगुड ( शशी दरेकर ) : बिद्री ता. कागल येथे गारगोटी कोल्हापूर रस्त्याच्या कडेला 40 ते 45 वर्ष वयाचे पुरुष जातीचे बेवारस प्रेत आढळून आले. याबाबतची वर्दी बिद्रीचे पोलीस पाटील रमेश महादेव ढवण यांनी मुरगुड पोलिसात दिली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अनोळखी पुरुष जातीचे प्रेत अंदाजे वय 40 ते 45 वर्ष, रंगाने सावळा, उंची ५ फुट ४ इंच, अंगाने सडपातळ, चेहरा उभट, नाक सरळ, केस काळे, डोळे अर्धवट मिटलेले, मिशा बारीक, अंगात पांढऱ्या रंगाचा हाप बाह्यांचा शर्ट, काळी फुल्ल पॅन्ट, उजव्या हातावर कन्नड भाषेत गोंदलेले आहे.
सकाळी ७. ३० वाजण्याच्या सुमारास प्रकाश वडगावकर यांच्याघराचे समोर रोडच्या कडेला आढळून आले. अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रशांत गोजारी करत आहेत.