बातमी

बाळासाहेब ठाकरे यांना अन्नपूर्णा शुगर केनवडे येथे आदरांजली

व्हनाळी (सागर लोहार) :

शिवसेनाप्रमुख, हिंदू ऋदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त केनवडे ता कागल येथे अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी कारखान्यातर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजनअन्नपूर्णा शुगरचे चेअरमन संजयबाबा घाटगे यांच्या हस्ते, संचालक के. पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

संजयबाबा घाटगे म्हणाले, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून मराठी माणसाला कायम स्फूर्ती मिळत राहते. बाळासाहेब ठाकरे यांच्या 46 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी अनेक राजकीय नेते घडविले. विरोधी पक्षांमध्येही त्यांच्याबद्दल कायमच आदर असल्याचे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

यावेळी संचालक धनाजी गोधडे, केदत्तोपंत वालावलकर ,दिनकर पाटील, सुभाष करंजे एम.बी .पाटील, विश्वास दिंडोर्ले, राजेश भराटे, वाय. टी. पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *