ताज्या घडामोडी

बाळासाहेबांचे कार्य अतुलनीय : अशोक पाटील

कागल शिवसेनेच्यावतीने ठाकरेंना आभिवादन

व्हनाळी (सागर लोहार) : मा. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कागल तालुका शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन कागल तालूका शिवसेना प्रमुख अशोकराव पाटिल, शिवगोंडा पाटील ,शहर प्रमुख अॅड पी.आर.सणगर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अशोक पाटील म्हणाले, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना करून राजकारणापेक्षा समाजकार्य करण्यावर आजपर्यंत भर दिला त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक नेते घडले, मराठी माणसांना नेहमीच त्यांच्या विचारांची प्रेरणा देण्याचे काम त्यांनी केले त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य अतुलनीय आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

यावेळी उपशहर प्रमुख प्रभाकर थोरात ,महिला जिल्हा संघटक सौ विदया गिरी ,तालुका संघटक सौ काचंन माने, शहर संघटक सौ दिपाली घोरपडे, उपतालुका प्रमुख श्री दिनकर लगारे ,विभाग प्रमुख श्री उतम पाटील व दयानंद स्वामी, सौरभ पाटील, वैभव अडके, धैर्यशील पाटील आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *