बातमी

औरनाळ ते आदमापूर पायी दिंडीचे मुरगूड मध्ये उत्साहात स्वागत

मुरगूड ( शशी दरेकर ) : एक दोन नव्हे तर तब्बल एकवीस वर्षे औरनाळ ता.गडहिंग्लज येथून आदमापुर च्या भंडाऱ्याला येणाऱ्या बाळूमामा दिंडीचे मुरगूड येथे भव्य स्वागत करण्यात आले.

    भजन आणि वाद्यवृंद यांच्या तालावर पुरुष महिला बंधू भगिनींनी घातलेली फुगडी आणि त्याद्वारे साधलेले वारकरी रिंगण हे या दिंडीचे मोठे आकर्षण ठरले.

     सानिका स्पोर्ट्स मार्फत सर्व वारकऱ्यांना केळी व राजीगरा लाडू, पाण्याची बाॅटल सहीत फराळ वाटण्यात आला  सानिका फौंडेशनचे चे संस्थापक माजी उपनगराध्यक्ष दगडु शेणवी  यांच्या वतीने दरवर्षी दिंडीचे मुरगूड शहरात स्वागत करुन त्यांना एकादशी निमित्त सर्व पायी दिंडीत सामील होणाऱ्या सर्वांना फराळाचे वाटप करण्यात येत असते त्यांना पी एस आय पांडुरंग कुडवे, मंडळाचे अध्यक्ष रतन जगताप, शिक्षक बँकेचे कॅशिअर राजेंद्र चव्हाण,फौजी राजेंद्र सावंत,निशांत जाधव,  निवास कदम, सूरज डेळेकर,गणेश तोडकर यांच्या सहकार्याने फराळ वाटप करण्यात आले.

  जेष्ठ पत्रकार वि.रा.भोसले, राजू चव्हाण, महादेव कानकेकर, प्रकाश तिराळे इत्यादींच्या हस्ते प्रसाद व फराळाचे वितरण करण्यात आले. एस टी बस स्थानक प्रांगणात हा भक्तीमय सोहळा आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला. दिंडीचे आयोजन औरनाळचे बाबासाहेब भोसले,पिंटू भोसले,गंगाराम भोसले, पांडुरंग भोसले,जनार्दन सुतार यांनी या दिंडीचे सारथ्य केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *