मुरगूड (शशी दरेकर): निढोरी ता. कागल येथे नागरिकांच्या
सुदृढ आरोग्यासाठी ग्रामपंचायतीने ओपन जिम, तर लहान मुलांना खेळणी साहित्याची उपलब्धता केल्याची माहीती सरपंच अमित पाटील यांनी दिली.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात लोकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे.दूरदर्शन ,मोबाईलच्या विळख्यात सापडलेल्या तरूणाईचे आरोग्य बिघडले आहे . याची दखल घेत निढोरी ग्रामपंचायतीने गावातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्याकरिता गावामध्ये ओपन जिम बसवली आहे तसेच गावातील लहान मुले ,अंगणवाडीतील बालके यांच्याकरिता खेळणी साहित्य ही बसवण्यात आले असल्याची माहिती सरपंच अमित पाटील यांनी दिली.