कागल(प्रतिनिधी) : सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या सुसज्ज ऊस बियाणे मळा व ऊस रोपवाटिकेचा शुभारंभ आज करनुर येथे कारखान्याचे अध्यक्ष तथा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे संचालक श्री. नविद हसनसो मुश्रीफ यांच्या शुभहस्ते झाले
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविताना श्री.नविद मुश्रीफ म्हणाले, संताजी घोरपडे कारखान्याच्या ऊस विकास योजनांमध्ये त्रिस्तरीय बियाणे मळा पद्धतीचा अवलंब गेले चार लागण हंगामापासून केला जात आहे. सदर सशक्त, निरोगी व निवडक बियाणांचा व ऊस रोपांचा वापर केलेल्या शेतकऱ्यांच्या ऊस पिकात रोग किडीचे नियंत्रण होऊन उत्पादनामध्ये भरीव वाढ झाली. यामध्ये बियाणांची जनुकीय पक्वता चांगली असल्याने कारखान्यास साखर उतार वाढीमध्ये देखील मदत होताना दिसत आहे.
सदर निवडक ऊस बियाणांची व ऊस रोपांची मागणी वाढत असून त्याची मागणीप्रमाणे पुरवठा व्हावा याकरिता माजी ग्रामविकास मंत्री मा.श्री.आ.हसनसो मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून कारखान्याने ऊस विकास योजनेअंतर्गत सदर योजनेची सुरुवात केली आहे. यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार विविध ऊस जातींचे कायमस्वरूपी सुदृढ बियाणांचा व ऊस रोपांचा पुरवठा करण्यात येणार आहे.
ऊस विकास योजनेअंतर्गतच सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोस्चाहनपर बेणे प्रक्रियेसाठी किंवा आळवणी साठी कृषी निविष्ठा देखील कारखाना धोरणानुसार अनुदान तत्वावर पुरवठा करणेत येणार असल्याचे देखील श्री.नविद मुश्रीफ यांनी जाहीर केले.
सदर कार्यक्रमास बाळासाहेब पाटील, मोहन कांबळे, अस्लम गजबर, सतीश येवले, संदीप आगळे, रोहित परीट समीर शेख, महेश कल्ले तथा ऊस उत्पादक शेतकरी व महिला उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक ऊस विकास अधिकारी श्री.उत्तम परीट यांनी केले तर आभार शेतीमदतनीस श्री.प्रमोद तारळेकर यांनी मानले.