मुरगूड ( शशी दरेकर ) – 21 व्या शतकात समाज हा असंवेदनशील बनत चालले आहे.समाजभान विसरत चाललेली पीढी जन्माला येत आहे. संवेदनशील मनाची माणसंच सामाजिक बांधिलकी जपत असतात. चंद्रकांत माळवदे हे संवेदनशील मनाचे आहेत त्यामुळेच परिश्रम,नम्रता आणि जिद्दीने यश खेचून आणुन सुद्धा माळवदे सामाजिक बांधिलकी जपताना दिसत आहेत. त्यामुळे माळवदेंचा हा संघर्षमय प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार ज्येष्ठ प्रसिद्ध मराठी साहित्यिका, माजी प्राचार्या लीला पाटील यांनी काढले.त्या चंद्रकांत माळवदे लिखित आत्मकथन ‘गोवऱ्या आणि फुले’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होत्या.
मुरगुड ता. कागल येथील सुवर्ण महोत्सवी श्री गणेश तरुण मंडळ यांच्या संयोजनातून ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत माळवदे लिखित आत्मकथन ‘गोवऱ्या आणि फुले’ पुस्तक प्रकाशन व ग्रंथदान सोहळासंपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध बालसाहित्यिक डॉ. मा. ग. गुरव होते.
यावेळी विविध ग्रंथालयांना या आत्मकथनाच्या 1000 प्रति भेट देण्यात आल्या.यावेळी ज्येष्ठ पत्रकार,गोवऱ्या आणि फुले या आत्मकथनाचे प्रकाशक सुभाष धुमे यांनी श्रीयुत माळवदे यांच्या संघर्षाचे कौतुक करणारे मानपत्र पाठवून या कार्यक्रमाच्या सौंदर्यामध्ये आणखिन भर घातली.या कार्यक्रमाचे स्वागत किशोर पोतदार तर प्रास्ताविक प्रशांत शहा यांनी केले.
लहानवयामध्येच आईवडिलांचे छत्र हरपलेले माळवदे खचून न जाता,जिद्दीने यशाची शिखरे सर करत राहीले.प्रसंगी हॉटेलमध्ये वेटर काम करून त्यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण केले.त्यामुळे संघर्षातून उभे राहिलेल्या माळवदेंचा आत्मकथनात मांडलेला प्रवास युवावर्गासाठी मार्गदर्शक ठरेल असा आशावाद दलितमित्र डी.डी.चौगले यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला.यावेळी आंतरराष्ट्रीय शिल्पकार एम. डी.रावण,प्रसिद्ध मराठी लेखक अरविंद मानकर,बालसाहीत्यिक डॉ मा.ग.गुरव यांनीही मनोगते व्यक्त केली.
यावेळी माजी नगराध्यक्ष . नामदेवराव मेंडके , श्री .व्यापारी नागरी सह .पतसंस्थेचे चेअरमन किरण. गवाणकर , संचालक प्रशांत शहा, शशी दरेकर, प्रदिप वेसणेकर, महादेव तांबट, धोडीराम मकानदार, कर्मचारी वर्ग, श्री .लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे चेअरमन अनंत फर्नाडिस, व्हा. चेअरमन विनय पोतदार, कर्मचारी वर्ग, गणेश तरुण मंडळाचे सर्व सभासद, शिवाजी चौगले, जोतिराम सुर्यवंशी, दत्तामामा खराडे, शाहू फर्नाडीस, दिगंबर बोरगांवे, नागरीक, महिला वर्ग उपस्थित होते. प्रा. विनय कुलकर्णी यानीं सुत्रसंचालन केले तर आभार सुहास बहिरशेट यानीं मानले .