बातमी

घरकुल – यशवंत किल्ला परिसर घेरलाय विविध समस्यांनी

कागल : येथील घरकुल ते यशवंत किल्ला परिसर विविध समस्यांनी घेरला असून या परिसरात भटकी कुत्री, गळक्या पाईपलाईन आणि जीर्ण अवस्थेतील धोकादायक विजेच्या डीपी मुळे नागरिक हैराण आहेत.

घरकुल ते यशवंत किल्ला परिसर हा कागल आहे. शहरातील एक निवांत परिसर म्हणून ओळखला जातो. कागल मधील जयसिंग पार्क, गहिनीनाथ नगर, यशीला पार्क, आंबील कट्टी, शाहू साखर कॉलनी या परीसरात खासकरून रिटायर्ड व्यक्तींची घरे बंगले आहेत. पण – विविध समस्यांनी हा परिसर घेरला आहे.

यशवंत कॉलनी जवळ के.वाय.डी.माने आण्णांच्या पुतळ्या समोरील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सार्वजनिक पाणीपुरवठा पाईप लाईनला गळती लागली असून या पाण्याच्या उंच फवारा वरच्या वीज वाहक तारेला स्पर्श करत आहे. यातून वीजेचा धक्का बसून अपघात होण्याची शक्यता आहे.

तसेच यशवंत कॉलनी येथील वाय. डी. माने फार्मसी कॉलेज मागे असणारी विजेची ट्रान्सफॉरमर डीपी जीर्ण अवस्थेत असून डीपीची दारे निखळली आहेत. डीपीतील फ्युज तुटल्या आहेत. या फ्युज तारेने जोडल्या आहेत. या ठिकाणी वर्दळ असल्याने भविष्यात धोका उत्पन्न होऊ शकतो. कागल वीज महावितरणने याकडे त्वरित लक्ष द्यावे अशी स्थानिकांची मागणी

घरकुल ते यशवंत किल्ला परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून ही कुत्री येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर हल्ला करत असत त दुचाकीवरील लोकांचा पाठलाग करत असतात. तसेच लहान मुले, विद्यार्थी व स्त्रियांच्यावर हल्ला करण्याच्या घटना घडल्या असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.. कागल नगरपालिकेने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करायला हवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *