हुपरी : संपूर्ण देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमाअंतर्गत “ माझी माती माझा देश ” हे अभियान राबविनेत येत आहे. त्यानुसार हुपरी नगरपरिषद हुपरी चे वतीने दि १४ऑगष्ट २०२३ रोजी या अभियानांचा सांगता कार्यक्रम आयोजित करणेत आला होता. देशाचे स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मे झालेल्या स्वातंत्र्य सैनिक यांचे स्मृतीना नमन करणे करिता सूर्य तलाव येथे शिला फलक उद्घाटन व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशी ७५ रोपांची लागवड केलेली अमृत वाटिका या वाटीकेचे उद्घाटन* सोहळा मा मुख्याधिकारी श्री अशोक कुंभार साहेब यांचे हस्ते संपन्न झाला.
सकाळी ठीक १०:०० वा हुतात्मा स्मारक या ठिकाणी मा आमदार राजूबाबा आवळे साहेब यांचे उपस्थितीत हुतात्मा वारस मा श्री जयसिंग गोपाळ चिटणीस यांचे हस्ते ध्वजारोहण करणेत आले. स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेले स्वातंत्र्य सैनिक, कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिक यांचे कुटुंबीय यांचा व भारतीय सरक्षण दलात आपली उत्तम कामगिरी बजावून सेवानिवृत्त झालेल्या सैनिक बांधवांचा सन्मान सोहळा मा आमदार राजूबाबा आवळे साहेब यांचे हस्ते पार पडला. यावेळी शहरातील सुमारे 38 स्वातंत्र्य सेनानी वारसांचा , वीर पत्नी व १४ सेवानिवृत्त सैनिक यांचा नगरपरिषद हुपरी चे वतीने शाल व सन्मानपत्र देवून गौरव करणेत आला.
यावेळी उपस्थित मान्यवर, शाळेचे विद्यार्थी यांनी हातात माती व मातीचे दिवे घेऊन देशाची एकात्मता बलशाली करून आणि देशाचे संरक्षण करणाऱ्या प्रती सन्मान बाळगू अशी *पंचप्रण शपथ घेतली* . या वेळी बोलताना मा आमदार राजू बाबा आवळे साहेब यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा ज्वाज्वल इतिहास सांगून सर्व शहीद जवानांना वंदन करत हुपरी वाशीयांचे आभार मानत स्वातंत्र्य लढ्याची माहिती देत स्वातंत्र्यलढ्याच्या स्मुर्ती जागविल्या.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मा श्री अशोक कुंभार साहेब यांनी केले, या मध्ये त्यांनी हुपरी नगरपरिषदचे वतीने वतीने दि ०९ ऑगष्ट २०२३ पासून राबविणेत आलेले सर्व उपक्रमाची माहिती दिली. यामध्ये ध्वजारोहण, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रंगभरण स्पर्धेत शहरातील १४ शाळांनी सहभाग नोंदवला असून प्रभातफेरी, सायकल फेरी, शहरातील सर्व पुतळा परिसर स्वच्छ करून घेणे आदि उपक्रम ही खूप चांगल्या पद्धतीने पार पाडले असलेने सर्व शाळांचे आभार मानले. हुपरी नगरपरिषद हुपरीचे वतीने राबविण्यात आलेल्या सर्व उपक्रमांचे मा खासदार धैर्यशील दादा माने साहेब यांनीही दूरध्वनीवरून अभिनंदन करून कार्यकमास त्यांनी शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन व आभार श्री रामचंद्र मुधाळे यांनी मानले. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. जयश्री गाट , जिल्हा परिषद मा अध्यक्ष नानासाहेब गाट, श्री. आणासाहेब शेंडूरे, सुदर्शन खाडे, सुभाष कागले, प्रतापराव जाधव, किरण कांबळे, आदी मान्यवर तसेच नगरपरिषद हुपरीचे क्षितिज देसाई, प्रसाद पाटील, प्रदीप देसाई, रोहित कनवाडे, ज्योती पाटील, श्रद्धा गायकवाड, मिरासो शिंगे, उदय कांबळे, विनोद कांबळे आदी अधिकारी कर्मचारी यांचे सह शहारातील सर्व शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.