कागल (विक्रांत कोरे) : करनूर ता. कागल येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मरीआई, बिरदेव मंदिर येथे रक्तदान शिबिर व डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून शिबिरास सुरुवात करण्यात आले.
शिबिरा दरम्यान रक्तदान शिबिरामध्ये 35 जणांनी रक्तदान केले. संजीवन ब्लड बँक कोल्हापूर यांनी रक्त संकलन केले. तसेच डोळे तपासणी शिबिरामध्ये शंभर जणांचे डोळे तपासणी करण्यात आले आहे. आय क्रेप्ट ॲप्टकल्स कोल्हापूर यांनी डोळे तपासणी केली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या शिबिराचे आयोजन ओन्ली फ्रेंड्स सर्कल यांनी केले होते. शिबिरासाठी अनिल ढोले, योगेश पाटील, शिवराज घोरपडे, अक्षय चव्हाण, मुस्तफा शेख, शितल डुगे, तेजस घाटगे, प्रकाश सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.