कागल(विक्रांत कोरे) : कागल- हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील विद्युत पुरवठा व इतर विविध समस्या बाबत महावितरणचे अधीक्षक अभियंता व मॅक पदाधिकारी यांच्यामध्ये बैठक संपन्न झाली. यावेळी कागल- हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहत मधील विद्युत पुरवठा व इतर समस्या बाबत असणाऱ्या समस्यांचेनिवेदन महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांना देण्यात आले.
निवेदनामध्ये साउंड कास्टिंग प्रा. लि. या कंपनीच्या नवीन सुरू होणाऱ्या युनिट लागणाऱ्या विद्युत पुरवठ्याबाबत. डी व जी ब्लॉक करिता नवीन सब स्टेशन उभारणीसाठी मऔवि महामंडळाकडून भूखंड बदलून दिला, असून नवीन सबस्टेशन लवकरात लवकर उभारणे. कागल- हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये महावितरण कार्यालयाचे ऑफिस होणे. कागल- हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये महावितरण कार्यालयाचे कर्मचारी वर्ग वाढविणे.
कागल- पंचतारांकित औद्योगिक वसाहत मधील अनेक उद्योजकांचे एनडीडीएफ स्कीम मधील परतावा मिळणे बाकी आहे तो त्वरित मिळावा. कागल- हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील काही उद्योजकांना इलेक्ट्रिसिटी ड्युटीची माफी ची रक्कम मिळालेली नाही, तरी ती त्वरित मिळावी. कागल- हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर शेजारील बसविण्यात आलेल्या सुरक्षा पेट्या (बॉक्स) बंदिस्त नाहीत त्या बंदिस्त करण्यात याव्यात.
कागल- हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील बी व सी ब्लॉक मध्ये स्विचींग स्टेशन करणे. तसेच कागल व हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये नवीन विद्युतपुरवठा मिळणेबाबत मागणी केलेल्या उद्योजकांची यादी मॅकला देणे.अशा विषयांवर चर्चा करण्यात आली. सदरच्या विषयांवर लवकरात- लवकर तोडगा काढून सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी दिले.
सदर बैठकीस कार्यकारी अभियंता सुनील शिंदे, उपकार्यकारी अभियंता विनोद घोलप, असि. अभियंता विना मटकर, अभियंता महेश पाटील, मॅक चे अध्यक्ष संजय पेंडसे, उपाध्यक्ष यशवंत पाटील, संचालक हरिश्चंद्र धोत्रे, स्वी. संचालक विठ्ठल पाटील, साउंड कास्टिंग चे वसंत वरुटे, तानाजी पाटील, कृष्णा मसुरकर आदी उपस्थित होते.