मडिलगे(जोतीराम पोवार) – आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार असणार असल्याचे ठाम प्रतिपादन माजी आमदार व बिद्रीचे चेअरमन के.पी. पाटील यांनी व्यक्त केले ते वाघापूर तालुका भुदरगड येथे आमदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत भुदरगड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित व लोकनियुक्त सरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते यावेळी आमदार हसन मुश्रीफ व के पी पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित व लोकनियुक्त सरपंचांचा सत्कार करण्यात आला
यावेळी बोलताना के.पी.पाटील म्हणाले या पुढील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिंकणार असून यापुढे विकास निधी कोणापुढेही मागायचा नाही व आपणच विधानसभेच मैदान मारायचं असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आमदार हसन मुश्रीफ म्हणाले सरपंचांनी सर्वांना विश्वासात घेऊन गावचा कारभार करावा जलजीवन व नळ पाणीपुरवठा या योजना राज्याच्या व केंद्र शासनाच्या निधीतून उभारत असून जलजीवन या कामाचा चांगला दर्जा कसा राहील याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी गोकुळचे संचालक रणजीतसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास भुदरगड तालुका राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे मधुकर देसाई, धनाजी देसाई के. ना .पाटील, बिद्रीचे संचालक अशोकराव कांबळे, संग्राम देसाई, धैर्यशील पाटील, राजेंद्र भाटले विश्वनाथ कुंभार, विलास कांबळे, धोंडीराम वारके यांच्यासह नेताजी आरडे, धनाजी बरकाळे, शिवाजीराव गुरव, अण्णासो घाटगे, श्रीपती दाभोळे, तानाजी कुरडे यांच्यासह भूदरगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक राधानगरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष पंडितराव केणे यांनी तर स्वागत नूतन लोकनियुक्त सरपंच बापूसो आरडे यांनी सूत्रसंचालन प्रकाश पाटील यांनी तर आभार सुनील कांबळे यांनी मानले