कागल : दि कागल एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्री प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने यांच्या वाढदिवसानिमित्त वाय डी माने कॅम्पस मध्ये जॉय ऑफ गिविंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्याला देण्यात जो आनंद आहे तो विद्यार्थ्यांना कळावा या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाय डी माने कॅम्पस मधील सर्व शाळा व महाविद्यालये यांनी शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना धान्याचे संकलन करण्याचे आव्हान करण्यात आले होते.
त्यामध्ये कॅम्पस मधून जवळजवळ 251 किलो तांदूळ, 110 किलो साखर,70 किलो डाळ,गहू 50 किलो तसेच अन्य कडधान्य गोळा करून कागल मधील कुरणे वसाहतमधील 55 गरीब व गरजू कुटुंबांना श्री भरत सोनटक्के यांचे उपस्थित धान्य वाटण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन कॅम्पस डायरेक्टर सौ शिल्पा पाटील यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या प्रसंगी संस्थेचे संचालक मान. श्री बिपिन माने, ए डी माने इंटरनॅशनल स्कूलचा मुख्याध्यापिका सौ शैलजा करोशी, वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य श्री सचिन माळी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विदयार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
दि कागल एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्री प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने यांच्या वाढदिवसानिमित्त वाय डी माने कॅम्पस मध्ये जॉय ऑफ गिविंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जॉय ऑफ गीविंग थिमची माहिती मिळताच व संस्थेचे सेक्रेटरी मान.श्री प्रताप ऊर्फ भैय्या माने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर यांनी याप्रसंगी संस्थेला दोन कॉम्प्युटर दिले. याप्रसंगी नेहमीच संस्थेसोबत असणारे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर (मेन) चे संचालक व उद्योजक श्री गिरीश कर्नावत ,रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर (मेन) चे अध्यक्ष श्री. अरविंद तराळ व रोटरी क्लबचे श्री. निलेश कुट्टी उपस्थित होते.या कार्यक्रमास संस्थेचे संचालक श्री बिपिन माने ,कॅम्पस डायरेक्टर सौ शिल्पा पाटील आदी उपस्थित होते.