बातमी

सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला हरित ऊर्जेचा राष्ट्रीय पुरस्कार

सेनापती कापशी: बेलेवाडी काळम्मा (ता.कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला हंगाम २०२०-२१ सालचा राष्ट्रीय हरित ऊर्जेच्या पुरस्कार मिळाला. भारत सरकारने भारतीय हरित उर्जा फेडरेशनच्यावतीने बायोएनर्जीमध्ये आऊटस्टँडिंग रिन्युएबल जनरेशन हा देशातील सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय स्तराचा मानला जाणारा पुरस्कार प्रदान केला.

प्रमुख पाहुणे केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी, उर्जा व खते मंत्री श्री.भगवंत खुबा यांच्या उपस्थीतीत झालेल्या कार्यक्रमात नवी दिल्ली येथे वितरीत करणेत आला.

यामध्ये कारखान्यास हरित व पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मितीबद्दल द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कारखान्याचे चेअरमन श्री.नवीद मुश्रीफ म्हणाले, सभासद शेतक-यांच्या विश्वाासाच्या पाठबळावर कारखान्याने मिळविलेले हे यश निचितच प्रेरणादायी आहे. शेतकरी केंद्रबिंदु माणुन याकारखान्याचा कारभार सुरू आहे. कारखान्याने वृक्षारोपणासह हरित ऊर्जा क्षेत्रामध्ये केलेली कामगिरी उल्लेखनिय आहे. तसेच टाकाऊपासुन विकाऊ व पर्यावरणपुरक उर्जानिर्मिती करीत या कारखान्याने राष्ट्रीय कार्याला हातभार लावला आहे.

या पुरस्कारासाठी कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री. संजय शामराव घाटगे व इलेक्ट्रीकल विभागाचे व्यवस्थापक श्री. बी. ए. पाटील, श्री.हुसेन नदाफ, श्री.मिलींद पंडे, श्री भुषन हीरेमठ यांचे योगदान, सहकार्य व प्रयत्नातुन शक्य झाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *