बातमी

सकाळ चित्रकला स्पर्धा २०२३ संपन्न

कागल : येथील श्री यशवंतराव घाटगे हायस्कूलच्या केंद्रावर १४६ बालचित्रकारांनी आपल्या कल्पनेतील भावविश्व कागदावर उमटविले. प्रश्नपत्रिकेवरील विषयाशी समरस होऊन उभ्या, आडव्या रेषांनी चित्राला आकार दिला. चित्राला रंग भरल्यावर त्यात आलेला जिवंतपणा पाहून बालकलाकारांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट जाणवत होता. निमित्त होते ‘सकाळ चित्रकला स्पर्धेचे या स्पर्धेत मुकबधीर विद्यालयाचे १८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

कागल : श्री यशवंतराव घाटगे स्कूल केंद्रावर चित्रकला स्पर्धेत चित्र काढण्यात मग्न असलेले बालकलाकार

हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही.डी. मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. ज्येष्ट कला शिक्षक जगन्नाथ भोसले यांच्याहस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ‘सकाळ’चे उपसंपादक अमरसिंह घोरपडे, संजय साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्घाटन समारंभावेळी जगन्नाथ भोसले म्हणाले, माणसाच्या जीवनाला कलावंतांनी सुंदरच आणले. ‘सकाळ’ने सुरू केलेली ही चित्रकला स्पर्धा निश्चितच बालकलाकारांचे जीवन समृद्ध करत आहे. गेली ३७ वर्षे अखंड सुरु असलेल्या या स्पर्धेमधून अनेक चित्रकारांनी प्रेरणा घेतली आहे.

या स्पर्धेला कागल शहर व परिसरातून चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अर्जून पाटील, ए.व्ही. घाटगे, राजकुमार माने, नाथा चव्हाण, एकनाथ तोडकर, संदीप सणगर, सचीन कांबळे, धोंडीराम पाटील, जमीर नदाफ, हर्षवर्धन बोते, रोहित घोरपडे, सुनिल खोत, जमीर ताशिलदार, बातमीदार नरेंद्र बोते आदिंचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *