बातमी

सदाशिवराव मंडलिक संस्कार भवनमध्ये चिमुकल्यानीं भरवला आठवडी बाजार

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील सदाशिवराव मंडलिक संस्कार भवन आयोजित शनिवार दिनांक 9 मार्च 2024 रोजी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा आठवडी बाजार हा उपक्रम घेण्यात आला .विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक ज्ञानात भर पडावी , पैशाची देवाण – घेवाण कळावी यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या शेतातील भाजीपाला किंवा इतर वस्तू, घरात करण्यात आलेले खाद्यपदार्थ, किराणा, स्टेशनरी इत्यादी विक्रीसाठी आणण्यात आले होते .  विद्यार्थ्यांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. भाजीपाला , शेवगा , वांगी , टॉमेटो , गाजर , मुळा , कोथंबीर, यासह -खाद्यपदार्थांचे स्टॉल, या_बाजारामध्ये विक्रीसाठी लावण्यात आले होते . सावर्डेकर कॉलनी कापशी रोड या ठिकाणी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर आठवडी बाजाराचे उद्घाटन कागल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. जी. बी .कमळकर  साहेब यांच्या हस्ते -झाले. उद्घाटन प्रसंगी शिवराज विद्यालय व जुनिअर कॉलेज मुरगुड चे प्राचार्य श्री पी.डी.माने, रविंद्र शिंदे सर, व्होकेशनल विभाग प्रमुख जे  . ए. पाटील सर, तसेच  शिवराज विद्यालय व जुनिअर कॉलेज मधील शिक्षक वर्ग , विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूलच्या शिक्षिका सौ. एस. बी. पाथरवट मॅडम संस्कार भवन च्या मुख्याध्यापिका सौ योगिनी शेटे मॅडम व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, पालक, महिला तसेच सावर्डेकर कॉलनीच्या परिसरातील लोक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *