बातमी

लोकनेते स्व. सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मृतीदिनानिमित्य जेष्ठ नागरिक संघात अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल मुरगूड शहर जेष्ठ नागरिक संघात पुरोगामी तत्त्वज्ञान अखेरच्या श्वासापर्यंत जपणारे … लोककल्यानाचा ध्यास घेऊन सतत कार्यरत राहिलेले … स्वच्छ चरित्र आणि चारित्र या बळावर कोल्हापूर जिल्हयाच्या राजकारण व समाजकारणावर आपल्या कर्तुत्वरुपी नेतृत्वाचा ठसा उमटविणारे लोकनेते स्व. सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्य श्री. विनायक हावळ व श्री. बापूसाहेब गुजर यांच्या हस्ते फोटो पूजन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रास्ताविक आणि स्वागत संचालक श्री. जयवंत हावळ यांनी केले .

यावेळी संचालक श्री. सदाशिवराव एकल ( इंजिनीअर ) , आर डी चौगले, पी आर पाटील, अशोक डवरी, प्रा. महादेव सुतार , विनायक हावळ यानीं मंडलिक साहेबांच्या कार्यकर्तुत्वाच्या एकेक आठवणीना उजाळा दिला. या अभिवादन प्रसंगी जेष्ठ नागरीक संघाचे सभासद, बहुसंख्य नागरीक उपस्थित होते. आभार संचालक श्री. सिकंदर जमादार यानीं मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *